One Nation One Election: मोठी बातमी! 'एक देश, एक निवडणूक' होणार? विधी आयोगाचा अहवाल तयार

One Nation One Election: देशात लोकसभा, विधानसभांसह अन्य निवडणुका एकाच वेळी घेण्यासंदर्भात विधी आयोगाचा अहवाल तयार झाला आहे.
One Nation One Election Latest Updates
One Nation One Election Latest UpdatesSaam TV
Published On

प्रमोद जगताप, साम टीव्ही

One Nation One Election Latest Updates

देशात लोकसभा, विधानसभांसह अन्य निवडणुका एकाच वेळी घेण्यासंदर्भात विधी आयोगाचा अहवाल तयार झाला आहे. लवकरच हा अहवाल मंत्रालयात सादर केला जाणार असल्याची माहिती आहे. 2026 च्या परिसीमनानंतर एक देश एक निवडणूक शक्य होऊ शकते, असे विधी आयोगाने आपल्या अहवालात म्हटलं आहे. (Latest Marathi News)

One Nation One Election Latest Updates
Shivsena News: उद्धव ठाकरेंना शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह परत मिळणार? आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

मागील काही दिवसांपासून देशात 'वन नेशन वन इलेक्शन'बद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. 'एक देश, एक निवडणूक' झाल्यास सगळ्यात मोठा फायदा निवडणुकांवरील खर्च कमी होईल. निवडणुका एकाचवेळी घेतल्याने वेगवेगळ्या निवडणुकांवर करावा लागणार खर्च कमी होईल.

त्यामुळे केंद्र सरकारच्या या संकल्पनेचं अनेकांनी समर्थन केलंय. तर विरोधकांनी यावर जोरदार टीका देखील केली आहे. सरकारचे हे पाऊल म्हणजे देशाच्या संघराज्य संरचनेला धोका निर्माण करण्याचा प्रकार आहे, असं विरोधकांचं म्हणणं आहे.

विधी आयोगाने अहवालात काय म्हटलं?

एक देश एक निवडणूक लागू केल्यास काही विधानसभांचा कार्यकाळ हा एक वर्षाने कमी करावा लागेल, तर काही विधानसभेचा कार्यकाळ वाढवावा लागू शकतो. तर काही विधानसभा विसर्जित देखील कराव्या लागू शकतात असे अहवालात सांगण्यात आले आहे.

निवडणुका एकत्र घेण्यासाठी संविधान आणि संसदेच्या नियमांत काही बदल करण्याची देखील गरज असल्याचं विधी आयोगाचं मत आहे. 2026 च्या परिसीमनानंतर एक देश एक निवडणूक शक्य होऊ शकते, असे विधी आयोगाचे म्हणणे आहे.

One Nation One Election Latest Updates
Maharashtra Politics: शरद पवार नसते, तर अजितदादा सायकलवरून फिरताना दिसले असते; ठाकरे गटाचा चिमटा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com