Shivsena News: उद्धव ठाकरेंना शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह परत मिळणार? आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

Thackeray vs Shinde: निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिलं. यानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर आज महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे.
Will Uddhav Thackeray get Shiv Sena name and bow and arrow symbol  Hearing in Supreme Court today
Will Uddhav Thackeray get Shiv Sena name and bow and arrow symbol Hearing in Supreme Court todaySaam TV
Published On

प्रमोद जगताप, साम टीव्ही

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर खरी शिवसेना आपलीच आहे, असा दावा करत निवडणूक आयोगात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंचा (ठाकरे आणि शिंदे) युक्तीवाद ऐकल्यानंतर शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिलं. यानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर आज महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. (Latest Marathi News)

Will Uddhav Thackeray get Shiv Sena name and bow and arrow symbol  Hearing in Supreme Court today
Elections Survey: मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी आवडता नेता कोण? नवीन सर्वेक्षणात जनतेचा कौल कोणाला

याआधी सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) याचिकेवर 18 सप्टेंबरला सुनावणी घेतली होती. त्यावेळी कोर्टाने पुढील सुनावणी 3 आठवड्यांनी घेऊ, असं सांगितलं होतं. आता आज म्हणजेच बुधवारी ठाकरे गटाच्या याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला (Eknath Shinde) शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव देताना विधीमंडळातील आमदारांची संख्या आणि 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीतील विजयी झालेल्या शिवसेना उमेदवारांच्या मतांची आकडेवारी ग्राह्य धरली होती. या आकडेवारीनुसारच आयोगाने हा निकाल दिला होता.

शिवसेनेच्या विजयी उमेदवारांपैकी 76% मते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांना मिळाली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदारांना 23.5% मते मिळाली आहे. त्यामुळे मतांची तसेच विधीमंडळातील आकडेवारी पाहता, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर शिंदे गटाचाच अधिकार आहे, असं निवडणूक आयोगाने म्हटलं होतं.

2018 साली शिवसेना पक्ष घटनेत ज्या दुरुस्त्या केल्या गेल्या त्यांची आयोगाकडे नोंद नाही. 27 फेब्रुवारी 2018 रोजी जी पदाधिकारी नावे आयोगाला कळवली गेली त्यात प्रतिनिधी सभेचे विवरण नाही. त्यामुळे संघटनेत बहुमत असल्याच्या कसोटीची शहानिशा होऊ शकली नाही. त्यामुळे निवडून आलेल्या सदस्यांमध्ये बहुमताचा निष्कर्ष ग्राह्य धरावा लागला, असं म्हणत आयोगाने निकाल दिला होता.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेत याचिका दाखल केलेली आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आज सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited by - Satish Daud

Will Uddhav Thackeray get Shiv Sena name and bow and arrow symbol  Hearing in Supreme Court today
Pakistan vs Sri Lanka: वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने रचला इतिहास; असा कारनामा कुणालाच जमला नाही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com