Political News: भाजप आमदाराच्या वडिलांनी सरकारी जमीन हडपल्याचा आरोप, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

BJP MLA Maithili Thakur: भाजप आमदार मैथिली ठाकूरच्या वडिलांवर जमीन हडपल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले आहे.
Political News: भाजप आमदाराच्या वडिलांनी सरकारी जमीन हडपल्याचा आरोप, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
BJP MLASaam tv
Published On: 

भाजपच्या महिला आमदाराच्या वडिलांनी सरकारी जमीन हडपल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र देखील पाठवण्यात आले आहे. बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील पोखरभिंडा पंचायतीमध्ये अतिक्रमणावरून वाद सुरू आहे. गावकऱ्यांनी अलिनगरच्या आमदार मैथिली ठाकूर यांचे वडील रमेश ठाकूर यांच्यावर सरकारी जमीन, रस्ते आणि खासगी जमिनीवर जबरदस्तीने ताबा मिळवल्याचा आरोप केला आहे.

जमीन हडपल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी भाजप आमदाराच्या वडिलांविरोधात कारवाईची मागणी केली. त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांकडे संयुक्तपणे अर्ज दाखल केला आहे. न्यायाची मागणी करत गावकऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयालाही पत्र पाठवले आहे. गावकऱ्यांनी सहयोग पोर्टलवर आपला आक्षेपही नोंदवला आहे.

गावकऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीत असा आरोप केला आहे की, ग्रामदैवत तिवारी बाबा स्थानजवळील श्रद्धा स्थळ या सामुदायिक जमिनीवर आणि शशीनाथ मिश्रा चौक ते वॉटरवेज पर्यंतच्या रस्त्याच्या काही भागावर अतिक्रमण करण्यात आले आहे. हा रस्ता मुख्य रस्त्याला जोडतो. गावकऱ्यांसाठी तो त्यांच्या शेतांपर्यंत पोहोचण्याचा मुख्य मार्ग आहे. गावकऱ्यांच्या मते, रस्त्याच्या बांधकामामुळे वाहतुकिला अडथळा येत आहे. त्यामुळे शेती आणि घरगुती कामांमध्ये अडचणी येत आहेत.

Political News: भाजप आमदाराच्या वडिलांनी सरकारी जमीन हडपल्याचा आरोप, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
BJP vs Shivsena : माझ्याकडे रामदास कदमांच्या सिक्रेट क्लिप्स; 'फोटो बॉम्ब'नंतर भाजपचा खळबळजनक इशारा

एका गावकऱ्यांने आरोप केला की, त्यांच्या जवळपास तीन कठ्ठा खासगी जमिनीपैकी १४ एकर जमिनीवर जबरदस्तीने अतिक्रमण करून सीमाभिंत बांधण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या बागेत जाण्याचा मार्गही बंद झाला आहे. आणखी एका गावकऱ्याने त्यांच्या १५ एकर जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा आरोप केला. त्यांनी दावा केला की, जमिनीच्या बदल्यात दुसरी जमीन देण्याचा करार झाला होता पण जमिनीची अदलाबदलही झाली नाही आणि तिची किंमतही दिली गेली नाही. या गावकऱ्यांनी असाही आरोप केला आहे की, भूरक्षकाचे घर बांधण्यासाठी तलावातून जाणारा नाला बुजवण्यात आला आणि उरलेल्या जमिनीवर रस्ता बांधण्यात आला. तिवारी बाबा स्थान आणि सामुदायिक श्रद्धा स्थळाच्या जमिनीबाबतही गावकऱ्यांवर दबाव आणला जात आहे.

Political News: भाजप आमदाराच्या वडिलांनी सरकारी जमीन हडपल्याचा आरोप, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
Former BJP MP: 2 वेळा खासदार राहिलेल्या भाजपच्या नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात हळहळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.