PM Modi: 'सिर पर लाल टोपी रूसी..; पंतप्रधान मोदींना मॉस्कोमध्ये आठवलं राज कपूरचं गाणं VIDEO

India Russia PM Modi Sing Song : पंतप्रधान मोदींनी मॉस्कोमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केले. मी तिसऱ्या कार्यकाळात तिप्पट ताकदीने काम करणार असल्याचे वचन पंतप्रधान मोदींनी यावेळी दिलं.
पंतप्रधान मोदींना मॉस्कोमध्ये आठवलं राज कपूरचं गाणं
Pm Modi Sing Song Of Raj Kapoor BJP X

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशिया दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी रशियन भाषेत भारतीय समुदायाला संबोधित करत भाषणाला सुरुवात केली. आपण 140 कोटी भारतीयांचे प्रेम सोबत आणलंय, असे पंतप्रधान म्हणालेत. आपल्या भाषणात भारत-रशिया मैत्रीचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी राज कपूर यांच्या चित्रपटातील 'सर पर लाल टोपी रुसी' या गाण्याचाही उल्लेख केला.

येथे उपस्थित असलेले सर्व लोक भारत आणि रशियाच्या संबंधांना आणखी उंची देताहेत. रशिया हा शब्द ऐकल्यावर प्रत्येक भारतीयाच्या मनात पहिला शब्द येतो तो म्हणजे भारताचा सुख-दुःखाचा साथी, भारताचा विश्वासू मित्र. रशियामध्ये हिवाळ्याच्या हंगामात तापमान कितीही उणेपर्यंत खाली जात असले तरी भारत-रशियाची मैत्री नेहमीच अधिक उबदार राहिलीय. हे नाते परस्पर विश्वास आणि परस्पर आदराच्या मजबूत पायावर बांधलेले आहे.

यावेळी पंतप्रधान मोदींनी भारत आणि रशियामधील संबंधांची तुलना राज कपूर यांच्या चित्रपटातील 'सर पर लाल टोपी रुसी' या गाण्याशी केली. हे गाणं कधीकाळी इथल्या घराघरात गायले जायचं. राज कपूर यांच्या चित्रपटातील गाणं जुनं असले तरी ते आपल्या भावना सदाबहार करणारं आहे. दरम्यान पीएम मोदींनी रशियाच्या भेटीदरम्यान त्यांनी रशियन सांस्कृतिक मंडळाच्या कलाकारांचीही भेट घेतली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झालीय. रशियामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची वेदना भारत समजू शकतो. आगामी काळात भारत आणि रशियामधील संबंध अधिक दृढ होतील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

रशियाच्या मदतीने भारताला स्वस्त तेल मिळत आहे. “महामहिम आणि माझा मित्र या भव्य स्वागतासाठी आणि सन्मानासाठी मी तुमचे आभार व्यक्त करतो. भारतातील निवडणुकीत आमच्या अभूतपूर्व विजयानंतर तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दलही मी तुमचे आभार व्यक्त करतो, असंही मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदींना मॉस्कोमध्ये आठवलं राज कपूरचं गाणं
PM Modi Putin Meeting: पंतप्रधान मोदी रशिया दौऱ्यावर; राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची घेतली भेट PHOTO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com