अखेर भारतातील पहिली वंदेभारत स्लीपर ट्रेनची प्रतीक्षा संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 17 जानेवारी रोजी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहेत. नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील मालदा येथे भारतातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उद्घाटन केले. त्यांनी हावडा आणि गुवाहाटी दरम्यान धावणाऱ्या या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी चक्क ट्रेन चालकाची भेट त्याबद्दल माहिती घेतली. तसेच पंतप्रधानांनी प्रवाशीसोबत संवाद ही साधला. या ट्रेनमुळे हावडा-गुवाहाटी मार्गावरील प्रवासाचा वेळ 2.5 तासांनी कमी होईल असे सांगितले जात आहे. सध्या हावडा ते गुवाहाटी ट्रेनने प्रवास करण्यासाठी अंदाजे 18 तास लागतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट केल. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की उद्या भाजपच्या रॅलीवेळी मालदा आणि आजूबाजूच्या भागातील लोकांमध्ये येण्याची मी उत्सुकता बाळगत आहे. प्रत्येक दिवस जात असताना, टीएमसीच्या गैरकारभाराच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. पश्चिम बंगाल हा टीएमसीला कंटाळला आहे आणि त्यांना नकार देण्यास तयार आहे. लोकांना विकास करणारी भाजप सरकार पाहिजे आहे.
काय आहेत या ट्रेनची वैशिष्ट्ये?
वंदे भारत स्लीपर ट्रेन ही एक सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये एकूण 16 कोच आहेत. यामध्ये 11 थर्ड एसी, 4 सेकंड एसी आणि 1 फर्स्ट एसी कोच आहेत. थर्ड एसीमध्ये 611 बर्थ, सेकंड एसीमध्ये 188 आणि फर्स्ट एसीमध्ये 24 बर्थ आहेत. या ट्रेनमध्ये एकूण 823 प्रवासी प्रवास करू शकतात. वंदे भारत स्लीपरचा कमाल वेग ताशी 180 किलोमीटर आहे. ही ट्रेन पश्चिम बंगालमधील हावडा ते गुवाहाटी (कामाख्या) दरम्यानचे 958 किलोमीटरचे अंतर फक्त 14 तासांमध्ये पूर्ण करेल. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये फक्त कन्फर्म तिकिटे उपलब्ध असतील, यामध्ये कोणताही आरएसी किंवा वेटिंग लिस्ट नसेल, ज्यामुळे प्रवास आरामदायक होईल.
आरामदायी आणि नरम गादी असलेले बर्थ (स्लीपर बेड)
वरच्या बर्थवर सहज पोहोचवण्यासाठी नवीन डिझाईन केलेली शिडी
स्टेशनवर उघडणारे आणि बंद होणारे स्वयंचलित स्लाइडिंग दरवाजे
ट्रेन सुरक्षिततेसाठी कवच टक्करविरोधी प्रणाली
प्रत्येक कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्कालीन टॉक बॅक सिस्टम आणि फायर ब्रिगेड
आधुनिक बायो व्हॅक्युम टॉयलेट आणि स्पर्श मुक्त नळ
बंगाली आणि आसामी जेवण
जंतूनाशक तंत्रज्ञानामुळे डबे स्वच्छ आणि जंतुमुक्त राहतात याची खात्री होते.
वंदे भारत स्लीपर ट्रेनचे तिकीट दर( हावडा ते गुवाहाटी)
एसी थ्री टायर; अंदाजे 2000 ते 2,300
एसी टू टायर: सुमारे 2,500 ते 3000
फर्स्ट एसी: 3000 ते 3,600
ही ट्रेन हावडा या स्टेशवरून संध्याकाळी 6.20 मिनिटांनी निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8.20 मिनिटांनी पोहोचेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.