Petrol Diesel Price Today : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महाग? नवीनतम दर तपासा

Petrol Diesel Price Today 27 May 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज किंचित वाढ होताना दिसत आहे.
Petrol Diesel Latest Price
Petrol Diesel Latest PriceSaam TV

Petrol Diesel Rates: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज किंचित वाढ होताना दिसत आहे. WTI क्रूड 1.17 टक्क्यांच्या वाढीसह 72.67 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड 0.69 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 76.95 डॉलरवर विकले जात आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात. (Latest Marathi News)

Petrol Diesel Latest Price
Satara Crime News: धक्कादायक! डॉक्टरांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मृतदेह घेऊन नातेवाईक पोलीस ठाण्यात

आज आंध्र प्रदेशमध्ये पेट्रोल (Petrol) 1.22 रुपयांनी स्वस्त होऊन 111.17 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. डिझेलही 1.14 रुपयांनी घसरून 98.96 रुपये प्रति लिटरवर आले आहे. त्याचप्रमाणे केरळ आणि कर्नाटकसारख्या दक्षिण भारतातील इतर राज्यांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण होताना दिसत आहे.

इकडे उत्तर भारतात इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल 82 पैशांनी तर डिझेल (Diesel) 65 पैशांनी महागले आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाबमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. देशातील महानगर असलेल्या चेन्नईमध्ये पेट्रोल 23 पैशांनी आणि डिझेल 22 पैशांनी स्वस्त झाले आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

Petrol Diesel Latest Price
Ahmednagar Crime News: सुट्टीवर आलेल्या जवानावर १० ते १२ जणांकडून हल्ला; अहमदनगर जिल्ह्यातील भयानक घटना

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com