Satara Crime News: धक्कादायक! डॉक्टरांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मृतदेह घेऊन नातेवाईक पोलीस ठाण्यात

आपल्या मुलाचा मृतदेह पोलीस ठाणे आवारात ठेवला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Satara Crime
Satara Crimesaam tv
Published On

ओंकार कदम, सातारा

Satara News: सातारामधील कोरेगाव तालुक्यातून काळीज सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने डॉक्टरांच्या मारहाणीला कंटाळून आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतलाय. आत्महत्या करण्याआधी तरुणाने एक चिठ्ठी लिहिली होती. ही चिठ्ठी त्याच्या कुटुंबीयांच्या हाती लागली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचा मृतदेह पोलीस ठाणे आवारात ठेवला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest Crime News)

मिळालेल्या माहिती नुसार, शशिकांत चंद्रकांत बोतालजी असं मृत तरुणाच नाव आहे. या युवकाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. डॉक्टरांनी लबाडीने तब्बल 14 लाख रुपयांची अफरातफर केली, असा आरोप त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टरावर तातडीने गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

Satara Crime
Ahmednagar Crime News: सुट्टीवर आलेल्या जवानावर १० ते १२ जणांकडून हल्ला; अहमदनगर जिल्ह्यातील भयानक घटना

काय आहे संपू्र्ण घटना?

शशिकांत हा हॉस्पिटलमध्ये (Hospital) काम करत असताना त्याच्या खात्यावर डॉक्टरांनी टॅक्स वाचवण्यासाठी 6 लाख 10 हजारांचे ट्रांजेक्शन केलं. तसेच घराची जबरदस्ती नोटरी करून घेत डॉक्टरांनी जबरदस्तीने नावावर करून घेतले आहे. यासाठी त्याचा नकार होता. त्यामुळे डॉक्टरांनी युवकाला बेदम मारहाण केली.

या मारहाणीला आणि दबावला कंटाळून युवकाने चिठ्ठी लिहून ठेवत आत्महत्या केल्याने खळबळ उडालीये. संबंधित डॉक्टर सुहास चव्हाण,डॉ गणेश होळ आणि गोपाळ साळुंखे यांना अटक झाल्याशिवाय युवकाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेत मृतदेह कोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवला आसल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Satara Crime
Mumbai Crime News : विकासकाने पालिकेला घातला ५ कोटींचा गंडा! सदनिकांची केली परस्पर विक्री

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com