Petrol Diesel: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ-उतार होत असतात.
Petrol Diese Price
Petrol Diese PriceSaam Tv

नवी दिल्ली - देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात चढ-उतार होत असतात. मात्र, पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या काही दिवसापासून स्थिर असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. महिनाभरापूर्वी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण झाली. (Petrol Diesel Price Today)

सरकारी तेल कंपन्यांना कच्च्या तेलावर दिलासा मिळाला असला तरीही आज या कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले असून दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपयांना विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

हे देखील पाहा -

आजचे भाव काय आहेत?

- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

- मुंबई पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर

- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 प्रति लिटर

- नोएडामध्ये पेट्रोल 96.79 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर

- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

- पाटणामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

- पोर्टब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर

- भोपाळमध्ये पेट्रोल 108.65 रुपये आणि डिझेल 93.90 रुपये प्रति लिटर

- अहमदाबादमध्ये पेट्रोल 96.42 रुपये आणि डिझेल 92.17 रुपये प्रति लिटर

- अजमेरमध्ये पेट्रोल 108.85 रुपये आणि डिझेल 94.06 रुपये रुपये प्रति लिटर

- रांचीमध्ये पेट्रोल 99.84 रुपये आणि डिझेल 94.65 रुपये प्रति लिटर

- गंगानगरमध्ये पेट्रोल 113.65 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लिटर

Petrol Diese Price
अपघात झाल्याचे समजताच नागरिकांची घटनास्थळी धाव; दारुच्या बाटल्या पळविल्या

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर हे दररोज बदलतात. हे बदललेले दर रोज सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात.तुम्हाला जर हे रोजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहायचे असतील तर खालीलप्रमाणे जाणून घेऊ शकता.

-SMS द्वारे पेट्रोल-डिझेलचे रोजचे नवीन दर देखील जाणून घेऊ शकता. यासीठ इंडियन ऑइलचे ग्राहक RSP 9224992249 या नंबरवर आणि BPSL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP पाठवून दराबाबतची माहिती मिळवू शकतात. तर, एचपीसीएल ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPP price किंमत जाणून घेऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com