Petrol Diesel Price: अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेल महाग; जाणून घ्या इंधनाचे दर

Petrol Diesel Latest Price 28 june 2023: महाराष्ट्र, कर्नाटक आणि जम्मू-काश्मीरमध्येही पेट्रोल-डिझेल महाग झाले आहे.
Petrol diesel price
Petrol diesel priceSaam Tv
Published On

Petrol Diesel Price News Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जवळपास स्थिर आहेत. WTI क्रूड ०.०१७ डॉलरने वाढून प्रति बॅरल ६७.८७ डॉलरवर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड ०.२०डॉलरच्या वाढीसह प्रति बॅरल ७२.४६ डॉलरवर व्यापार करत आहे. त्यातच आता बुधवारी सकाळी देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी ६ वाजता इंधनाच्या किमती सुधारल्या जातात. (Latest Marathi News)

Petrol diesel price
Raigad Breaking: आंबेनळी घाटात दरड कोसळली; पोलादपूर- महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक ठप्प

आज बिहारमध्ये पेट्रोल ४२ पैशांनी आणि डिझेल ३९ पैशांनी स्वस्त झाले आहे. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात ५६ पैशांची घसरण झाली आहे. हिमाचल प्रदेशात पेट्रोल २९ पैशांनी तर डिझेल २६ पैशांनी कमी झाले आहे. पंजाबमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २४ पैशांनी घट झाली आहे.

दुसरीकडे, उत्तर प्रदेशात पेट्रोल आणि डिझेल ३६ पैशांनी महागले आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोलच्या दरात ४४ पैशांनी तर डिझेलच्या दरात ४१ पैशांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि जम्मू-काश्मीरमध्येही पेट्रोल-डिझेल महाग झाले आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७३ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल १०६.०३ रुपये और डीजल ९२.७६ रुपये प्रति लीटर

Petrol diesel price
Delhi Crime News: दिल्लीत मुलींच्या PG हॉस्टेलबाहेर तरुणाचं किळसवाणं कृत्य, Video इंटरनेटवर व्हायरल

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com