Petrol Diesel Price
Petrol Diesel PriceSaam Tv

Petrol Diesel: पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण
Published on

नवी दिल्ली - जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 0.53 डॉलरने घसरून 87.96 डॉलरवर आले आहे तर WTI ची किंमत प्रति बॅरल 1.74 डॉलरने घसरून 79.49 डॉलर प्रति बॅरल इतकी झाली आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) नवीन दर जाहीर केले आहेत. देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र, काही राज्यांमध्ये किमती थोड्या कमी झाल्या आहेत.

राज्यांबद्दल बोलायचे झाले तर बिहारमध्ये पेट्रोल 25 पैशांनी घसरून 108.90 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 23 पैशांनी घसरून 95.57 रुपये प्रति लिटरवर आले आहे. झारखंडमध्ये पेट्रोल 10 पैशांनी घसरून 100.23 रुपये आणि डिझेल 94.61 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. याशिवाय हरियाणामध्ये पेट्रोल 97.45 रुपये आणि डिझेल 90.20 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्येही इंधनाच्या दरात किंचित घट झाली आहे.

Petrol Diesel Price
Beed : भीषण अपघातात महिलेचा मृत्यू; पती आणि मुलगी गंभीर जखमी

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com