वृत्तसंस्था: देशामध्ये राजकीय (Political) वातावरण चांगलेच तापले आहे. आजपासून ५ राज्यामध्ये (state) निवडणुकांच्या (elections) पहिल्या टप्प्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. यामुळे, अनेक ठिकाणी कडक पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Petrol bomb attack BJP office around midnight)
हे देखील पहा-
यातच, चेन्नईत (Chennai) भाजप (BJP) कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला (Petrol Bomb) करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने तामिळनाडू (Tamil Nadu) येथील बीजेपी कार्यालयावर मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पेट्रोल बॉम्ब टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भाजपा नेते कराटे त्यागराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार की, आमच्या कार्यालयावर जवळपास १ ते १:३० वाजेच्या सुमारास पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले होते. यापूर्वी देखील १५ वर्षांअगोदर अशी धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये, डीएमकेचा हात होता. या घटनेविषयी आम्ही तामिळनाडू सरकारचा निषेध करत आहेत.
याप्रकरणी आम्ही पोलिसांना माहिती दिली असून भाजपा कार्यकर्ते अशा घटनांमुळे घाबरणार नाहीत, असेही त्यागराजन यांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री (CM) स्टॅलिन यांनी काही दिवसाअगोदर श्रीलंकेत (Sri Lanka) अडकलेल्या मच्छीमार आणि त्यांच्या बोटींना सोडविण्याकरिता श्रीलंकेबरोबर संवाद साधण्याची विनंती केली होती. मात्र, मोदींनी त्यावर कोणतीही कृती केलेली नाही.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.