Parvez Musharraf Passed Away: परवेझ मुशर्रफ होते कॅप्टन कूल धोनीचे फॅन, म्हणाले होते...

Parvez Musharraf On MS Dhoni : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचं दुबईत निधन झालं आहे.
Pervez Musharraf Passed Away
Pervez Musharraf Passed AwaySAAM TV

Parvez Musharraf And MS Dhoni: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचं दुबईत निधन झालं. ते बरेच दिवस आजारी होते. मुशर्रफ 2001 ते 2008 या काळात पाकिस्तानचे अध्यक्ष होते. ते भारतीय संघाचे माजी कर्णधार एमएस धोनीचे मोठे चाहते होते. मुशर्रफ यांनी महेंद्रसिंग धोनीला एकदा खास सल्ला दिला होता. हा सल्ला आजही क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात आहे.

काय म्हणाले होते मुशर्रफ

महेंद्रसिंग धोनी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला खूप लांब केस ठेवत होता. त्याची हेअरस्टाईल ही त्याची ओळख बनली होती. धोनीच्या हेअरस्टाइलचे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफही चाहते होते. त्यांनी धोनीला एका सामन्यादरम्यान सर्व केस कापू नका असा सल्ला दिला होता. मात्र एमएस धोनीने नंतर त्याचे केस छोटे केले.

Pervez Musharraf Passed Away
Pervez Musharraf : मोठी बातमी! पाकिस्तानचे माझी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन

भारतीय संघाने 2005-06 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. या दौऱ्यातील तिसरा एकदिवसीय सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात धोनीने 46 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने नाबाद 72 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता.

या सामन्यानंतर परवेझ मुशर्रफ यांनी धोनीचं कौतुक केलं होतं. 'मी मैदानात अनेक फलक पाहिलेत, ज्यात धोनीला केस कापण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु मला वाटते की तू केस कापू नयेत, यात तू खूप छान दिसतोस", असे ते म्हणाले होते.

Pervez Musharraf Passed Away
Sidharth-Kiara Wedding: कियाराला आज लागणार सिद्धार्थच्या नावाची मेहंदी, शाही विवाह सोहळ्याचा असा आहे थाट

दिल्लीत झाला होता मशुर्रफ यांचा जन्म

परवेझ मुशर्रफ यांचा जन्म 11 ऑगस्ट 1943 रोजी नवी दिल्लीतील दर्यागंज येथे झाला. यानंतर 1947 मध्ये त्यांच्या कुटुंबीयांनी पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला. परवेझ मुशर्रफ यांनीही काही वर्षे तुर्कीमध्ये वास्तव्य केले होते. परवेझ मुशर्रफ यांचे शालेय शिक्षण कराचीतील सेंट पॅट्रिक स्कूलमध्ये झाले आणि त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण लाहोरच्या फॉर्मन ख्रिश्चन कॉलेजमधून झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com