
Kiara Advani-Sidharth Malhotra Wedding News: बॉलिवूडमधील क्यूट कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. कियारा आणि सिद्धार्थ यांचा 6 फेब्रुवारीला राजस्थानच्या जैसलमेरमध्ये शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. दोघांचे कुटुंबिय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल.
कियाराला लागणार सिद्धार्थच्या नावाची मेहंदी
आजपासून या शाही लग्न सोहळ्याचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू होत आहेत. आज सुरुवातीला गणेश स्थापना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर कियाराला सिद्धार्थच्या नावाची मेहंदी आणि हळद लावली जाणार आहे. या विधीसाठी विशेष तयारी करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
मेहंदीनंतर भव्य संगीत कार्यक्रम
मेहंदी आणि हळदीनंतर संध्याकाळी एका भव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी परफॉर्म करणार हळदी आणि मेहंदी विधीनंतर सोमवारी ६ फेब्रुवारीला कियारा आणि सिद्धार्थ जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये सात फेरे घेऊन कामयचे एकमेकांचे होतील. लग्नानंतर 7 फेब्रुवारीला ग्रॅण्ड पार्टीही होणार आहे.
विवाहाची जय्यत तयारी
कियाराच्या ब्रायडल मेकअप आणि कॉस्च्युम डिझाइनसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. वेडिंग ड्रेससाठी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि मेक-अपसाठी स्वर्णलेखा गुप्ता विवाहाच्या ठिकाणी पोहोचल्या आहेत. कियाराचे हेअरस्टायलिस्ट अमित ठाकूर आणि बॉलीवूडची मेहंदी डिझाइन क्वीन वीणा नागडा देखील लग्नाच्या ठिकाणी पोहोचली आहेत. वेडिंग शूट कव्हर करण्यासाठी विशाल पंजाबी त्याच्या संपूर्ण टीमसह जैसलमेरमध्ये दाखल झाले आहेत.
हे पाहुणे राहणार उपस्थित
या शाही विवाह सोहळ्यासाठी बॉलिवूडचे स्टार्स जैसलमेरला पोहोचणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार करण जोहर, शाहिद कपूर, मीरा राजपूत, ईशा अंबानी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी रविवारी रात्री 12 वाजता मुंबईहून येणाऱ्या चार्टर फ्लाइटने लग्नस्थळी पोहोचतील. या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांच्या यादीत अमिताभ बच्चन, विकी कौशल, कतरिना कैफ, सलमान खान यांच्या नावाचीही चर्चा आहे.
कडक सुरक्षा व्यवस्था
या हायप्रोफाईल लग्नात सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे. शाहरुख खानचा एक्स बॉडीगार्ड यासिनला लग्नाच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. पाहुण्यांचे मोबाईल बाहेर जमा करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. चाहते आता कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाच्या फोटोंची वाट पाहत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.