Pathan 11th Day Collection: 'पठान' ठरला भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, आमिरच्या सात वर्षांपूर्वीच्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला

'पठान' हा आठ दिवसांत परदेशात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
Pathaan 10th day collection
Pathaan 10th day collectionSaam Tv

Pathan 11th Day Box Office Collection: शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर 'पठान' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या शाहरुखचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे.

कमाईच्या बाबतीत 'पठान' चित्रपट एकापाठोपाठ एक नवे रेकॉर्ड बनवताना दिसत आहे. दरम्यान, बाहुबली 2 आणि KGF 2 ला मागे टाकत शनिवारच्या कमाईनंतर 'पठान' 400 कोटी कमावणारा चित्रपट ठरला आहे.

Pathaan 10th day collection
Abhishek Bachchan: अभिषेकलाही करावा लागला होता स्ट्रगल

'पठान' चित्रपटाने 11व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सुमारे 21-23 कोटींची कमाई केली आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी चित्रपटाच्या कमाईमध्ये वाढ झाली आहे. 11 दिवसांच्या कमाईनंतर, 400 कोटींची कामे करणारा हा पहिला बॉलीवूड चित्रपट देखील ठरला आहे. 'पठान'ने दंगलचा 387 कोटी कमाईचा सात वर्षांचा विक्रम मोडला आहे. तसेच बॉलीवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.

चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणारा शाहरुख खान बॉक्स ऑफिसवर राज्य करताना दिसत आहे. 'पठान' हा आठ दिवसांत परदेशात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

10 दिवसांत जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. इतकंच नाही तर 'पठान' हा भारतात 11 दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे, यामुळे शाहरुखचे चाहते खूप आनंदी दिसत आहेत.

शाहरुख खान शेवटचा अनुष्का शर्मासोबत झिरो चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. 'पठान'नंतर शाहरुख खान जवान या चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे पोस्टर देखील रिलीज करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com