Abhishek Bachchan: अभिषेकलाही करावा लागला होता स्ट्रगल

अभिषेक बच्चनला इंडस्ट्रीत येण्यासाठी आणि पहिल्या चित्रपटात काम मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.
Abhishek Bachchan
Abhishek BachchanInstagram @bachchan
Published On

Abhishek Bachchan Straggle: अभिषेक बच्चन आज वाढदिवस आहे. अभिषेक बच्चन चांदीचा चमचा तोंडात घेऊन घेऊन जन्माला आला आहे, असे नेहमीच बोलले होते. अभिषेक बच्चनचे आजोबा हरिवंशराय बच्चन हे महान कवी होते आणि आई आणि वडील दोघेही चित्रपट जगतातील प्रसिद्ध स्टार आहेत. अभिषेक बच्चनला आयुष्यात कधीही संघर्ष करावा लागला नसेल, असा सर्वांचाच समज आहे.

अभिषेक बच्चनला इंडस्ट्रीत येण्यासाठी आणि पहिल्या चित्रपटात काम मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. अभिषेक बच्चनने एका मुलाखतीदरम्यान त्याच्या संघर्षाविषयी सांगितले आहे. दोन वर्षांच्या संघर्षानंतर त्याला 'रिफ्युजी' हा पहिला चित्रपट मिळाला. चला जाणून घेऊया अभिषेक बच्चन आणि त्याच्या करिअरबद्दल...

अभिषेक बच्चनचा जन्म 5 फेब्रुवारी 1976 रोजी मुंबईत अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या घरी झाला. अमिताभ बच्चन अमिताभ आणि जयाचे दुसरे अपत्य आहे. त्याला श्वेता बच्चन नंदा ही मोठी बहीण आहे. अभिषेक बच्चन बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी एलआयसी एजंट म्हणून काम करायचा. मात्र, अभिनेता होणं नशिबात लिहिलं होतं.

Abhishek Bachchan
Urvashi Dholakia Accident: अभिनेत्री उर्वशी ढोलकिया थोडक्यात बचावली, कारला स्कूल बसची जोरदार धडक

वडील अमिताभ बच्चन यांची मदत न घेता अभिषेक बच्चनने बॉलिवूडमध्ये स्वतःचा ठसा उमटवला आहे. 2000 साली अभिषेकने 'रिफ्युजी' चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. या चित्रपटात अभिषेकसोबत करीना कपूरही होती. दोघांचा हा डेब्यू चित्रपट होता.

अभिषेक बच्चनला 'रिफ्युजी' चित्रपट मिळवण्यासाठी दोन वर्षे लागली, असे म्हटले जाते. एका मुलाखतीदरम्यान अभिषेक बच्चन म्हणाला होता, 'अनेक लोकांचा असा विश्वास आहे की मी अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे, त्यामुळे लोक माझ्यासाठी काम घेऊन २४ तास रांगेत उभे राहिले असते, पण तसे अजिबात झाले नाही. पदार्पण करण्यापूर्वी मी अनेक दिग्दर्शकांकडे गेलो आणि त्यांच्याशी बोललो. मात्र, त्यांनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला.

अभिषेकचा पहिला चित्रपट 'रेफ्युजी' फ्लॉप ठरला होता. अभिषेक बच्चनला चित्रपट निवडीचा अनुभव नसल्याने त्याचा परिणाम असा झाला की चार वर्षांत त्याने 17 फ्लॉप चित्रपट दिले.

2004 मध्ये अभिषेक बच्चनने 'धूम' चित्रपटात काम केले आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटानंतर त्याने 'बंटी और बबली', 'युवा', 'ब्लफमास्टर', 'गुरु' आणि 'दोस्ताना' सारखे सुपरहिट चित्रपट देऊन आपण अमिताभ बच्चन यांचा मुलगा असल्याचे सिद्ध केले.

अभिषेक बच्चनच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले आहेत. पण, शेवटी त्याने स्वत:ला प्रस्थापित केले. अर्थात, तो अजूनही आपल्या वडिलांइतके नाव कमावू शकलेला नाही. पण, त्याने अनेक कमाल चित्रपटांमध्ये उत्तम काम केले आहे.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, अभिषेक बच्चनने 2007 मध्ये बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत लग्न केले. या जोडप्याला आराध्या बच्चन ही मुलगी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com