Crime News : गावावरून वडिलांसाठी शहरात आला, मैत्रीनं घात केला; रस्त्यात गाठून विद्यार्थ्याला निर्दयीपणं संपवलं

Patna Crime News : पाटण्यात २०० रुपये आणि सिगारेटच्या किरकोळ वादातून बीएच्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
Crime News : गावावरून वडिलांसाठी शहरात आला, मैत्रीनं घात केला; रस्त्यात गाठून विद्यार्थ्याला निर्दयीपणं संपवलं
Patna Crime News Saam Tv
Published On
Summary
  • २०० रुपये आणि सिगारेटच्या वादातून विद्यार्थ्याची हत्या

  • पाटण्यात गुंडांनी दुकानावर हल्ला करून हत्या केली

  • मृत विद्यार्थी बीएच्या पहिल्या वर्गात शिकत होता

  • पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन तपास सुरू केला

पाटणामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका विद्यार्थ्याला रस्त्यात गाठून त्याची हत्या करण्यात आली आहे. २०० रुपये आणि सिगारेटच्या वादातून ही हत्या झाल्याचे म्हटले जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गौरव कुमार असं या मृत तरुणाचं नाव आहे. तो बीएच्या पहिल्या वर्गात शिकत होता असून लखीसराय जिल्ह्यातील बरहिया ब्लॉकमधील रामनगर हृदनबिघा येथील रहिवासी होता. त्याचे वडील पाटणा येथे व्यवसाय करतात. गौरव काही दिवसांपूर्वी गावाहून वडिलांना भेटण्यासाठी पाटणा येथे आला होता.

Crime News : गावावरून वडिलांसाठी शहरात आला, मैत्रीनं घात केला; रस्त्यात गाठून विद्यार्थ्याला निर्दयीपणं संपवलं
Nanded : 'तुझी बिर्याणी करून टाकू...', नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या नवऱ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

दरम्यान मंगळवारी संध्याकाळी एमआयजी पार्कजवळ गौरव गेला होता. त्याने एका मित्राला चहा आणि सिगारेट खरेदी करण्यासाठी २०० रुपये दिले होते. मात्र त्याने ते परत केलेच नाही. यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि तिथे उपस्थित असलेल्या काही मुलांनी गौरवला घेरले आणि त्याला मारहाण केली. त्यानंतर परिस्थिती शांत झाली. जखमी गौरव घरी परतला आणि त्याने त्याच्या कुटुंबाला माहिती दिली, परंतु आरोपीने गौरवचा त्याच्या वडिलांच्या दुकानापर्यंत पाठलाग केला.

Crime News : गावावरून वडिलांसाठी शहरात आला, मैत्रीनं घात केला; रस्त्यात गाठून विद्यार्थ्याला निर्दयीपणं संपवलं
Crime News : घराच्या छपरावर चढला, आईवर बंदुकीने निशाणा धरला; पोटच्या मुलाने केली जन्मदात्रीची गोळी झाडून हत्या

मंगळवारी रात्री काठ्या, रॉड आणि धारदार चाकू घेऊन आलेल्या सुमारे १५ ते २० तरुणांनी गौरवच्या वडिलांच्या लोहिया नगरमधील राणी स्टील शटर नावाच्या दुकानावर हल्ला केला. कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे की, हल्लेखोर आधीच दुकानाभोवती रेकी करत होते. संधी मिळताच गुंडांनी दुकानाच्या गेटवर गौरवला घेरले आणि त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली.

Crime News : गावावरून वडिलांसाठी शहरात आला, मैत्रीनं घात केला; रस्त्यात गाठून विद्यार्थ्याला निर्दयीपणं संपवलं
Shocking : धक्कादायक! दुचाकीवरून जाताना गळा कापला अन् खाली कोसळले , चिनी मांजाने घेतला ऑर्थोपेडिक सर्जनचा जीव

त्यानंतर त्यांनी त्याचा गळा चिरला. गुंडांनी त्याला वाचवण्यासाठी आलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही मारहाण केली, ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले.या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तसेच इतर फरार आरोपींचा शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com