संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामकाज सुरू होण्याआधी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना जोरदार चिमटा काढला.
या अधिवेशनाचा कालावधी खूप कमी आहे. मात्र, तो वेळेचा विचार केला तर खूप मोठा आहे. हे ऐतिहासिक निर्णयांचे अधिवेशन आहे. अधिकाधिक वेळ कामकाजासाठी मिळावा. रडगाणं गायला खूप वेळ मिळतो. रडगाणं गात राहा, असा उपरोधिक टोला मोदींनी विरोधकांना लगावला. (Latest Marathi News)
'आज देश आत्मविश्वासानं भारलेला आहे. त्याचवेळी संसदेचे हे विशेष अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाचा कालावधी कमी आहे. मात्र वेळेच्या हिशेबाने खूप मोठा आहे. ऐतिहासिक निर्णयांचे हे अधिवेशन असेल,' असे PM मोदी म्हणाले. २०४७ मध्ये या देशाला विकसित देश करण्याचा संकल्पही मोदी यांनी यावेळी सोडला.
अधिवेशनाचा कालावधी खूप कमी आहे. अधिकाधिक वेळ कामकाजासाठी मिळावा, असं आवाहन मी सर्व आदरणीय खासदारांना करतो. रडगाणे गायला खूप वेळ असतो. ते करत राहा. जुन्या वाईट गोष्टी सोडून चांगल्यात चांगल्या गोष्टी घेऊन आपण नवीन संसद भवनात प्रवेश करणार आहोत, अशी मी आशा बाळगतो, असंही मोदी म्हणाले. (Parliament Special Session)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.