Rahul Gandhi Vs Narendra Modi: पावसाळी अधिवेशनात कडकडाट होणार, NDA सरकारला घेरणार!, राहुल गांधींनी सांगितले कळीचे १० मुद्दे

Parliament Session 2024: १८ व्या लोकसभेच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक होत मोदी सरकारला घेरण्याच्या तयारीत. राहुल गांधींनी कळीचे १० मुद्दे सांगितले. कोणते ते वाचा सविस्तर...
Rahul Gandhi Vs Narendra Modi: पावसाळी अधिवेशनात कडकडाट होणार, NDA सरकारला घेरणार!, राहुल गांधींनी सांगितले कळीचे १० मुद्दे
Narendra Modi Vs Rahul GandhiSaam Digital
Published On

18 व्या लोकसभेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. यादरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) वेगळ्याच अंदाजात दिसले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर संविधानावर हल्ला केल्याचा आरोप केला. आजच्या अधिवेशनावेळी संसदेबाहेर राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी संविधानाच्या प्रत हातामध्ये घेऊन आंदोलन केले.

याचबरोबर राहुल गांधींनी दावा केला की, पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) 'मानसिकदृष्ट्या बॅकफूटवर' आहेत आणि त्यांचे सरकार वाचवण्यात व्यस्त आहेत. संविधानावर हल्ला स्वीकारला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर राहुल गांधी यांनी नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करत मोदी सरकार (Modi Government) बॅकफूटवर का आहे यामागाची १० मुद्दे सांगितले आहेत. त्यांची पोस्ट व्हायरल होत आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत एनडीए सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधींनी या पोस्टमध्ये असे लिहिले की,'एनडीएचे पहिले १५ दिवस! १. भीषण रेल्वे अपघात. २. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले. ३. ट्रेनमध्ये प्रवाशांची दुर्दशा. ४. NEET घोटाळा. ५. NEET PG रद्द. ६. UGC NET चा पेपर लीक. ७. दूध, डाळी, गॅस, टोल आणखी महाग. ८. आगीने जळणारी जंगले. ९. जलसंकट. १०. उष्णतेच्या लाटेत व्यवस्था नसल्यामुळे अनेकांचे मृत्यू. मानसशास्त्रीयदृष्ट्या नरेंद्र मोदी बॅकफूटवर असून आपले सरकार वाचवण्यात व्यस्त आहेत.'

राहुल गांधी यांनी पुढे असे लिहिले की, 'नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या सरकारकडून संविधानावर झालेला हल्ला आम्हाला मान्य नाही आणि आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. 'इंडिया' आघाडीचा मजबूत विरोधक आपला दबाव कायम ठेवेल, जनतेचा आवाज उठवेल आणि पंतप्रधानांना उत्तर दिल्याशिवाय जाऊन देणार नाही.'

Rahul Gandhi Vs Narendra Modi: पावसाळी अधिवेशनात कडकडाट होणार, NDA सरकारला घेरणार!, राहुल गांधींनी सांगितले कळीचे १० मुद्दे
VIDEO: लोकसभेच्या पहिल्या सत्राला सुरुवात, नव्या संसद भवनात Narendra Modi यांच्याकडून खासदारांचं स्वागत

राहुल गांधी आज संसदेच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा संविधानावर हल्ला करत आहेत. राज्यघटनेवर हा हल्ला आम्ही होऊ देणार नाही. हा हल्ला आम्हाला मान्य नाही.' दरम्यान, १८व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी हातात संविधानाच्या प्रती घेऊन संसदेच्या बाहेर आणि लोकसभेच्या दालनाकडे घोषणाबाजी केल्या. त्यामुळे या अधिवेशनामध्ये विरोधक मोदी सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये असल्याचे दिसून येत आहे.

Rahul Gandhi Vs Narendra Modi: पावसाळी अधिवेशनात कडकडाट होणार, NDA सरकारला घेरणार!, राहुल गांधींनी सांगितले कळीचे १० मुद्दे
PM Narendra Modi Video: भारताला लवकरच गरिबीतून मुक्त करणार, पीएम मोदींचे जनतेला मोठं आश्वासन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com