प्रमोद जगताप, दिल्ली| ता. १९ डिसेंबर २०२३
लोकसभेतून विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करण्याचे सत्र काही थांबत नसल्याचे चित्र आहे. काल लोकसभेत ३३ खासदारांचे निलंबन झाल्यानंतर आज (मंगळवार, १९ डिसेंबर) पुन्हा एकदा विरोधकांच्या ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शशी थरुर यांचा यामध्ये समावेश आहे.
संसदेची सुरक्षा भेदल्याची (Parliament Security Breach) घटना घडल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. घुसखोरीनंतर लोकसभेच्या कामकाजात सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. संसद सुरक्षेच्या प्रश्नावरुन आजही (१९, डिसेंबर) लोकसभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. ज्यानंतर पुन्हा ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.
काल ३३ खासदारांचे निलंबन केल्यानंतर आता पुन्हा तब्बल ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. आज निलंबित केलेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule), अमोल कोल्हे (Amol Kolhe), कॉंग्रेसचे शशी थरुर (Shashi Tharur), मनिष तिवारी, डिंपल यादव, यांच्या नावाचा समावेश आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, याआधीही संसदेच्या कामकाजात गोंधळ घातल्या प्रकरणी १९ आणि त्यानंतर ३३ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. आता पुन्हा ४९ खासदारांचे निलंबन झाल्याने कारवाईचा आकडा १४१ वर गेला आहे. देशाच्या इतिहासात लोकसभा आणि राज्यसभेतून एवढ्या मोठ्या संख्येने खासदार निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.