Bharat Gogawale News : 'बाळासाहेबांची भावना जाणून घेण्यासाठी वर जावं लागेल'; संघाच्या 'बौद्धिक'नंतर भरत गोगावलेंची जीभ घसरली

Bharat Gogawale News : डॉ. हेगडेवारांना अभिवादन करण्यासाठी अनेक मंत्री, आमदार सकाळीच रेशीमबागेत दाखल झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या कार्यालयातील भेटीनंतर शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली.
Bharat Gogawale
Bharat Gogawale Saam TV
Published On

सूरज मसुरकर

Bharat Gogawale News :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेतील कार्यालयात भाजपसह महायुतीच्या घटक पक्षांचे मंत्री आणि आमदारांनी आज उपस्थिती लावली. भाजपचे नेते दरवर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान रेशीमबागेतील स्मृती मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतात.

डॉ. हेगडेवारांना अभिवादन करण्यासाठी अनेक मंत्री, आमदार सकाळीच रेशीमबागेत दाखल झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या कार्यालयातील भेटीनंतर शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bharat Gogawale
Uddhav Thackeray : आजच्या बैठकीत 'इंडिया आघाडी'चा चेहरा ठरणार? उद्धव ठाकरेंचे सर्वात मोठे विधान; म्हणाले...

शिवसेना आमदारांनी आज रेशीमबागेत हजेरी लावली, बाळासाहेब ठाकरे यांची आज भावना काय असती? या प्रश्नावर बोलताना गोगावली यांची जीभ घसरली. त्यांची भावना आता वर जाऊन विचारावी लागेल, असं भरत गोगावले यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

नागपूरमध्ये संघांचं आज बौद्धिक होतं. पहिल्यांदाच आम्हाला तिथे निमंत्रण देण्यात आलं होतं. येथे उपस्थिती लावल्याने समाधान वाटलं. हेगडेवारांचं काम आम्ही ऐकून होतं. आज प्रत्यक्षात अनुभवता आलं.

संघाच्या नेत्यांना देशहितासाठी काही सूचना आम्हा सर्वांना केल्या आहे. संघाची पंचसूत्री आहे, ती देशहितासाठी स्वीकारण्यास काही हरकत नाही, असं त्यांचा म्हणणं आहे. महापुरुषांनी देशहितासाठी त्याग केला आहे. त्या त्यागातूनच देश उभा राहिला आहे, असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.

Bharat Gogawale
Maharashtra Political News : मनसेच्या बैठकीत कोणत्या २२ जागांवर चर्चा झाली? संभाव्य उमेदवारांची नावंही चर्चेत

निमंत्रण मिळालं म्हणून आलो

शिवसेना-भाजपची युती मागील २५ वर्षापासून युती आहे. मात्र तेव्हा आम्हाला बोलवलं की नाही मला माहित नाही. मात्र आता आम्हाला बोलवलं आहेत तर आम्ही इथे आलो आहोत, असं भरत गोगावले यांनी म्हटलंय.

देशहितासाठी हेगडेवार यांनी चांगलं काम केलं आहे. देशासाठी मोठा त्याग त्यांनी केला आहे. देशासाठी ज्यांनी त्याग केला आहे, त्यांना सलाम करण्याला हरकत काय? गांधी, नेहरु यांना देखील लोक आज सलाम करतात, असं भरत गोगावले यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com