Sansad Ratna Award: श्रीकांत शिंदे, निशिकांत दुबेंसह १२ खासदारांना मिळणार संसद रत्न पुरस्कार, वाचा संपूर्ण यादी

Sansad Ratna Award 2026 List Out: यंदा १२ खासदार आणि ४ संसदीय समित्यांची संसद रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार संसदेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि लोकशाही मूल्यांना बळकटी देणाऱ्या खासदारांना दिला जातो.
Sansad Ratna Award 2026 List Out:
SHRIKANT SHINDE, NISHIKANT DUBEY AMONG 12 MPS TO RECEIVE SANSAD RATNA AWARD 2026saam tv
Published On
Summary
  • संसद रत्न पुरस्कारासाठी १२ खासदारांची निवड जाहीर.

  • श्रीकांत शिंदे, निशिकांत दुबे यांचाही पुरस्कारात समावेश.

  • संसदेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांचा सन्मान.

या वर्षीच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी बारा खासदार आणि चार संसदीय समित्यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठी वैयक्तिक श्रेणीत निवड झालेल्या खासदारांमध्ये भाजपच्या जगदंबिका पाल (उत्तर प्रदेश), पी. पी. चौधरी (राजस्थान), निशिकांत दुबे (झारखंड) आणि शिवसेनेचे श्रीकांत एकनाथ शिंदे (महाराष्ट्र) यांचा समावेश आहे, असे 'प्राइम पॉइंट फाउंडेशन' या खासगी संस्थेने दिलेल्या निवेदनात म्हटलंय.

Sansad Ratna Award 2026 List Out:
PM Modi - Donald Trump : मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा PM मोदींसाठी महत्वाचा निरोप; व्हाइट हाऊस भेटीचं निमंत्रण धाडलं

संसद रत्न पुरस्कार २०१० साली सुरू करण्यात आला आणि हा पुरस्कार संसदेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी अत्यंत सक्रिय असलेल्या खासदारांना दिला जातो. भारतीय लोकशाहीतील कोणत्याही लोकप्रतिनिधीसाठी संसद रत्न पुरस्कारासाठी निवड होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. ही निवड प्रक्रिया अशा खासदारांना आणि समित्यांना समोर आणते, ज्यांनी कोणताही गाजावाजा न करता सभागृहातील धोरणात्मक चर्चा आणि जनहितासाठी आपले सर्वोत्तम योगदान दिलंय.

Sansad Ratna Award 2026 List Out:
लोकसभेत घुमणार महिलांचा आवाज! संसदेत दिसणार आता 850 खासदार

कोणाला मिळणार पुरस्कार?

प्राइम पॉइंट फाऊंडेशनने जारी केलेल्या निवेदनानुसार, या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरपर्यंत संसदेतील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रवीण पटेल (उत्तर प्रदेश), विद्युत बरन महतो (झारखंड), लुंबरम चौधरी (राजस्थान), हेमंत विष्णू सावरा (महाराष्ट्र), स्मिता उदय वाघ (महाराष्ट्र), नरेश गणपत म्हस्के (महाराष्ट्र), मेधा विश्राम कुलकर्णी (महाराष्ट्र) आणि नरहरी अमीन (गुजरात) यांना विविध श्रेणींमध्ये सन्मानित केलं जाणार आहे.

चार समितींनाही मिळणार पुरस्कार

उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे चार संसदीय समित्यांचीही या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये चरणजीत सिंग चन्नी यांच्या अध्यक्षतेखालील कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालील वित्त समिती, सप्तगिरी शंकर उलाका यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामीण विकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील कोळसा आणि खाण समिती यांचा समावेश आहे.

या वर्षीच्या नामांकनांमध्ये अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी राजकारण्यांचा समावेश आहे. ज्यांनी दीर्घकाळापासून शासनाचे बारकाईने निरीक्षण केले आहे. माजी मुख्यमंत्री जगदंबिका पाल आणि चरणजीत सिंग चन्नी यांचा या प्रतिष्ठित यादीत समावेश आहे. गुजरातचेच असलेले नरहरी अमीन यांनी माजी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com