
संसदेच्या बजेट सत्राला सुरुवात झालीय पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिषणाणावरून काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी टीका केलीय. कृषी क्षेत्रात आधुनिककरण आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने सरकार करत असलेल्या योजनांची माहिती दिली. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवले असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या अभिषणाणात सांगितलं. त्याविधानावरून विरोधकांनी राष्ट्रपतींवर टीका केलीय.
संसदेत बजेट सत्राच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरून काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी प्रतिक्रिया दिलीय. राष्ट्रपती अखेरपर्यंत बोलताना खूप थकलेल्या जाणवत होत्या. बोलताना शेवटी त्यांना बोलता येत नव्हतं, असं म्हणतात त्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना बिचारी महिला संबोधलंय. तर राहुल गांधींनीही राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर टीका केलीय. राष्ट्रपतींचं अभिभाषण हे बोरिंग होतं, असं म्हटलंय. त्यांचे अभिभाषण हे खूप कंटाळवाणी होतं त्यात, काही नवं नव्हतं.
काँग्रेस नेत्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्ष काँग्रेसला कोंडीत पकडतील अशी शक्यता आहे. राष्ट्रपीत मुर्म यांनी आपल्या अभिभाषणात म्हटलं की, सरकार कृषी क्षेत्रातील सुधारण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीवर सरकार विशेष लक्ष देत आहे. जम्मू- काश्मीरमधील अनुच्छेद ३७० हटवण्यावरूनही राष्ट्रपतींनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
जम्मू-काश्मीरमध्ये विकासाचं नवीन वातावरण बनलंय. तसेच केंद्रशासित प्रदेशातील लोकसभा निवणुका ह्या अत्यंत शांतातपूर्व वातावरणात पार पडल्या. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, सरकारने ईशान्येकडील लोकांच्या मनातील अंतराची भावना दूर केलीय. विकसित भारताची एक महत्त्वपूर्ण कसोटी देशाचा संतुलित विकास आहे. कोणत्या क्षेत्राला असं वाटू नये ते विकासापासून दूर राहत आहेत.
सरकारने पूर्वोत्तर लोकांच्या याच भावना समजून घेतल्या आहेत. सरकारने लोकांच्या मनातील दुरावा कमी केलाय. १० पेक्षा जास्त शांती करार सरकारने अनेक गटांशी करत शांती प्रस्थापित केलं. ईशान्येकडील आठ राज्यांची क्षमता संपूर्ण देशाला पाहता यावी यासाठी या दिशेने पहिला अष्टलक्ष्मी महोत्सव आयोजित करण्यात आल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.