दिल्ली बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानी लोक गुगलवर काय सर्च करत होते? पाहा संपूर्ण यादी

Delhi Bomb Blast Shakes the Capital: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरण देशातील असंख्य माध्यमांनी कव्हर केलं. तसेच पाकिस्तानी मीडियानेही कव्हर केलं. आता पाकिस्तानी लोक सोशल मीडियात काय सर्च करीत आहेत? पाहा.
Delhi Bomb Blast Shakes the Capital
Delhi Bomb Blast Shakes the CapitalSaam
Published On
Summary
  • दिल्लीतील लाल किल्ली मेट्रो स्टेशनजवळ भीषण बॉम्बस्फोट

  • १२ ठार, अनेक जण जखमी

  • पाकिस्तानमध्ये गुगल ट्रेंडवर 'Delhi Blast' सर्चमध्ये वाढ

सोमवारी सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ भीषण बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटामुळे संपू्र्ण राजधानी हादरली. हुंडई आय २० चारचाकीमध्ये अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे आग लागली. जवळपासच्या सहा कार आणि अनेक ऑटोरिक्षा लगेचच जळून खाक झाल्या. या अपघातात किमान १२ जणांचा मृत्यू झाला. तर, अनेक जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

भीषण बॉम्बस्फोटामुळे गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बॉम्बस्फोट घडताच परिसरात दाट धुराचे लोट पसरले होते. घटनास्थळी मृतदेह पडले होते. घटना घडल्यानंतर २० हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या, दिल्ली पोलीस, एनएसजी आणि फॉरेन्सिक पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी UAPA कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा एक दहशतवादी कटाचा प्रकार होता का? या दृष्टीनेही तपास सुरू आहे.

Delhi Bomb Blast Shakes the Capital
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाईंडचा फोटो समोर; नक्की कुणी कट रचला? साथीदार अन् भावांनाही अटक

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतान दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावर असताना भाषणादरम्यान त्यांनी, ' दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल; एकालाही सोडणार नाही', असा थेट इशारा दिला. तर, गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. तर, दिल्ली आणि मुंबईसह अनेक प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Delhi Bomb Blast Shakes the Capital
३ मुलांचा बाप अन् आईचा आधार; दिल्लीतील बॉम्बस्फोटात बस कंडक्टरचा मृत्यू, कुटुंबाचा आधार हरपला

पाकिस्तानच्या गुगल ट्रेंडमध्ये काय?

दरम्यान, भारत आणि जगभरातील असंख्य माध्यमांनी ही घटना कव्हर केली आहे. तसेच पाकिस्तानने देखील ही घटना कव्हर केली आहे. पाकिस्तानची मीडिया संस्था डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीच्या गर्दीच्या भागात झालेल्या बॉम्बस्फोटामुळे शहरात घबराट पसरली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या एजन्सीद्वारे केली जात आहे.

दरम्यान, पाकिस्तानमधील काही जण गुगलमध्ये दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी माहिती सर्च करीत आहेत. ट्रेंड्सवरून असे दिसून येते की, पाकिस्तानी वापरकर्ते प्रामुख्याने स्फोट नेमका कसा झाला? नुकसान किती झाले? तपास कोणत्या दिशेनं सुरू आहे, याबाबत माहिती घेण्यासाठी काही जण गुगलमध्ये सर्च करत आहे. पाकिस्तानी लोक Xच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये दिल्ली बॉम्बस्फोटाबाबत सर्च करत असल्याचं दिसून आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com