पाकिस्तान जगाच्या पाठीवर हा पहिला देश असेल जिथं दहशतवाद्यांसाठी भरती निघालीये. होय तुम्ही जे ऐकलंय ते अगदी खरंय.... पाकिस्तानात आता बेरोजगारांना दहशतवादी बनवण्यासाठी हाफिज सईदने मास्टर प्लॅन आखलाय. गंभीर बाब म्हणजे पाकिस्तानी लष्कराच्या मदतीनं हे सगळं होणार आहे. पाकमधील नागरिकांना दहशतवादी बनवण्यासाठी आणि भारताविरोधात लढण्यासाठी हाफिज सईदचा मुलगा हा कट आखतोय, अशी माहिती समोर आलीये.
लष्कर-ए-तैयबानं सुरू केली दहशतवाद्यांची भरती
हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदची लष्कर कमांडर्ससोबत गुप्त बैठक
भारत-पाक तणावाचा फायदा घेत दहशतवादी भरतीचा कट
मरकझी मुस्लिम लीगची भारताविरोधात नागरिकांना चिथावणी
भारतानं पाकची पुरती कोंडी केली. त्यामुळे आयात बंदी, पाणी बंदी यामुळे पाकिस्तानी नागरिक बेहाल आहेत. त्यामुळे मरकझी मुस्लिम लीग हे भारत विरोधात पाकमध्ये तणाव निर्माण करत आहे. परंतू भारत आक्रमक झाल्यानंतर सगळे दहशतवादी सध्या बिळात लपून बसलेत. काश्मिरमधील प्रत्येक गल्लीगल्लीत आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये सध्या लष्कराचं अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सुरुये. 100च्या वर दहशतवाद्यांची घर जमिनदोस्त करुन भारतानं पाकचं कबरडं मोडलंय. त्यामुळे अर्धेअधिक दहशतवादी ढगात तर अर्धेअधिक दहशतवादी बिळात अशी सध्या हाफिज सईदची अवस्थाय. खुद्द हाफिज सईदच्या सुरक्षेवरुन पाकला घाम फुटलाय. पाकिस्ताननं त्याला घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना केल्यायेत.
सध्या पाकची सर्व बाजून कोंडी झालीये. पाकच्या सैनिकांनी युद्धाआधीच सामुहीक राजीनामे देत तलवारी म्यान केल्यायेत. त्यामुळे सईदनं पुन्हा दहशतवादी तयार करण्यासाठी ही मेगा भरती सुरु केलीये. जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ओसामा बीन लादेन पाकिस्तानच्या अबोटाबाद मध्ये २०११ मध्ये मारला गेला. दाऊद इब्राहीम, हाफिज सईद असे सगळेच जगाची शांतता भंग करणारे दहशतवादी पाकमध्ये असल्याचे पुरावे वेळोवेळी जगासमोर आलेत. त्यामुळं भारतानं आता असा आसूड ओढावा की पाक आणि तेथील दहशतवादी पुन्हा भारताकडे वाकड्या नजरेने बघणार नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.