PoK रिकामं करा, तेव्हाच चर्चा; तिसऱ्यानं नाक खुपसू नये, पाकिस्तानच्या नथीतून भारताचा अमेरिकेवर बाण

India-Pakistan Tension : युद्धबंदीनंतरही ताळ्यावर न आलेल्या पाकिस्तानला भारतानं तंबी दिली आहे. पाकव्याप्त काश्मीर रिकामं करा, तरच द्विपक्षीय चर्चा होईल, असं भारतानं सुनावलं. तसेच या मुद्द्यात हस्तक्षेप करणाऱ्या अमेरिकेलाही अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
Donald Trump Shahbaz Sharif Narendra Modi
Donald Trump Shahbaz Sharif Narendra Modisaam tv
Published On

भारत-पाकिस्तान यांच्यातील चिघळलेला वाद अमेरिकेमुळं सुटला असं जगाला सांगून पाठ थोपटून घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना भारतानं खडेबोल सुनावले. आधी पीओके रिकामं करा, तरच द्विपक्षीय चर्चा होईल. तिसऱ्या देशानं यात हस्तक्षेप करू नये, असा इशारा देतानाच भारतानं पाकिस्तानच्या नथीतून अमेरिकेवर बाण सोडला.

भारत-पाकिस्तान या दोन देशांत तणाव चिघळला होता. भारतानं प्रहार केल्यानंतर भानावर आलेल्या पाकिस्तान भारतासमोर गयावया आला आणि युद्धबंदी करण्याची विनवणी केली. भारतानंही आढेवेढे न घेता युद्धबंदी करण्यास सहमती दर्शवली. पण तरीही पाकिस्तानचं शेपूट वाकडंच राहिलंय. युद्धबंदीनंतरही पाकिस्तानकडून उल्लंघन सुरू आहे. आता बिथरलेल्या पाकिस्तानला भारतानं कडक शब्दांत इशारा दिला आहे. आधी पाकव्याप्त काश्मीर (PoK) रिकामं करावं लागेल, तरच द्विपक्षीय चर्चा सुरू होई आणि सर्व मुद्दे सोडवले जातील, असं भारतानं सांगितलं.

Donald Trump Shahbaz Sharif Narendra Modi
India Pakistan Tension: पाकिस्तानकडून गोळ्या आल्या तर इकडून तोफगोळे फेका; युद्धविरामानंतर मोदींचा पाकिस्तानला इशारा| VIDEO

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. काश्मीर मुद्दा हा भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवला गेला पाहिजे, अशी भारताची पूर्वीपासूनची भूमिका आहे. ही भूमिका आजही कायम आहे, ती बदलली नाही. काश्मीर मुद्द्यावर तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप आम्हाला अजिबात मान्य नाही, असं ठणकावून सांगतानाच भारत-पाकिस्तान वाद आमच्या मध्यस्थीने सुटल्याची टिमकी वाजवणाऱ्या अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे.

Donald Trump Shahbaz Sharif Narendra Modi
India Pakistan Tension: शिमला करारानुसार तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही; शरद पवार काय म्हणाले? VIDEO

१० मे रोजी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये चर्चा झाल्यानंतर युद्धबंदीवर सहमती झाली. त्याच दिवशी १२.३७ वाजता पाकिस्तानकडून याबाबत विनंती करण्यात आली होती. मात्र तांत्रिक कारणांमुळं हॉटलाइनवर दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चा होऊ शकली नाही. त्यानंतर दुपारी ३.३५ मिनिटांनी पुन्हा दोघांमध्ये चर्चा झाली, असंही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता जयस्वाल यांनी स्पष्ट केलं.

युद्धबंदीच्या चर्चेत व्यापाराची चर्चा नाहीच!

भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धबंदीसाठी अमेरिकेने मध्यस्थी केली, तसेच व्यापार बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर युद्धबंदीवर सहमती झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. तो भारताने स्पष्टपणे खोडून काढला. अमेरिकी नेत्यांसोबतच्या चर्चेत व्यापाराच्या मुद्द्याचा साधा उल्लेखही करण्यात आला नव्हता, असं जयस्वाल यांनी सांगितलं.

पाकिस्तानला पाणी देणारच नाही!

पाकिस्ताननं दहशतवाद पोसला आहे. भारतासह जगभरातील निर्दोष लोकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांना भारतानं नष्ट केले, असं जयस्वाल यांनी सांगितलं. सिंधू जल करार स्थगितीवरही भारतानं ठाम भूमिका मांडली. पाकिस्तान सीमेवरील दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करत नाही, तोपर्यंत भारत सिंधू जल करार स्थगितच ठेवणार आहे, अशी रोखठोक भूमिकाही जयस्वाल यांनी मांडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com