नोबेलसाठी पाकची युद्धात मध्यस्थी? काकासाठी पुतणी मागते नोबेल

Maryam Sharif Nobel Resolution Full Controversy Explained: पाकिस्तानकडून पंतप्रधान शहबाज शरीफ यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्याची मागणी करण्यात आली आहे. मरियम शरीफ यांच्या ठरावामुळे जगभरात पाकिस्तानची खिल्ली उडत असून या मागणीमागील सत्य काय आहे, जाणून घ्या सविस्तर.
Pakistan’s Nobel Peace Prize demand triggers global ridicule amid ongoing tensions
Pakistan’s Nobel Peace Prize demand triggers global ridicule amid ongoing tensionsSaam Tv
Published On

जगात अजब-गजब गोष्टींची कमी नाही, पण आता पाकिस्ताननं केलेल्या मागणीनं युद्धाच्या गंभीर वातावरणात हास्याचा फवारा फुटलाय. होय कारण पाकिस्तानच्या पंजाब विधानसभेत पाक पंतप्रधान शहबाज शरिफची पुतणी मरियम शरिफनं आपल्या काकासाठी जबरदस्तीनं पास करवून घेतलेल्या ठरावानं जगभरात पाकिस्तानची खिल्ली उडवली जातेय. आता हा ठराव काय आहे पाहा

या ठरावात पाक पंतप्रधान शहबाज शरीफ, लष्करप्रमुखअसीम मुनीर आणि इशाक डार यांना आखाती युद्ध तात्पुरतं थांबवलं म्हणून नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करा अशी मागणी करण्यात आली.

ज्या मलाला युसूफजाईला नोबल पुरस्कार मिळाला तीला पाकिस्तानात गोळ्या घातल्या ..ती दुसऱ्या देशात आश्रितेय आणि यांना नोबल पाहिजे. खर तर आखातातलं युद्ध हे कायमचं नाही. तर तात्पुरतं थांबलंय. तात्पुरत्या युद्ध बंदीची घोषणा करुनही दोन्ही देश एकमेंकांना धमक्या देतायेत हल्ले करतायेत. तरीही पाकिस्तानला नोबल हवं आहे. शहबाज शरिफ सत्तेत आल्यापासून पाकिस्तानच कर्ज दुप्पट्टीनं वाढलं. महागाईचा आगडोंब दिवसेंदिवस पाकमध्ये वणव्यासारख्या भडकतो. बलुचिस्तान- अफगाणिस्तानने पाकला हैराण केलंय.

भारताकडूनही वेळोवेळी सर्जिकल स्ट्राईकचा प्रसाद मिळतोच आहे. इतक्या आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या पाकला जगभरातील नाचक्की रोखण्यासाठी आता हवा आहे नोबल जागतिक शांततेचा नोबल पुरस्कार थोडक्यात काय, तर 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा' अशी पाकिस्तानची गत झालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com