पाकिस्तानात खळबळ, रुग्णालयात सापडले तब्बल 500 मृतदेह, अनेकांचे अवयव गायब, नेमकं काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री चौधरी परवेझ इलाही यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
mismanagement of jalna women hospital in jalna district
mismanagement of jalna women hospital in jalna districtSaam Tv
Published On

कराची : पाकिस्तानातील (Pakistan) पंजाब निश्तार रुग्णालयामधून मोठी बातमी समोर आली आहे. या रुग्णालयात 500 बेवारस मृतदेह सापडले आहेत. सर्व मृतदेहांचे विविध अवयव काढण्यात आल्याचे देखील आढळून आले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे संपूर्ण प्रातांत खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल घेत पाकिस्तानी प्रशासनाने तपास सुरू केला आहे. (Latest Marathi News)

mismanagement of jalna women hospital in jalna district
Uddhav Thackeray : निवडणुकीत माझ्यासमोर उभे राहा, तुम्हालाही हरवेन; भाजप समर्थक आमदाराचं उद्धव ठाकरेंना आव्हान

निश्तार मेडिकल युनिव्हर्सिटीच्या निश्तार हॉस्पिटलमधून एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये उघड्यावर मृतदेह दिसत होते. मृतदेहांना वरच्या मजल्यावर आणि जुन्या लाकडी खाटांवर टाकण्यात आले होते. निश्तार हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, "मुलतानच्या निश्तार हॉस्पिटलच्या टेरेसवर मृतदेह कुजण्याची एक भयानक घटना समोर आली आहे, ज्यामुळे लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. (International News)

मुख्यमंत्री चौधरी परवेझ इलाही यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मृतदेह चुकीच्या पद्धतीने हाताळणाऱ्यांवर कडक कारवाईचे आश्वासन दिले. पाकिस्तानी मीडियानुसार, दक्षिण पंजाबच्या आरोग्य विभागाने निश्तार हॉस्पिटलच्या मृतदेहांच्या अवहेलनेच्या चौकशीसाठी सहा सदस्यांची टीम तयार केली आहे.

mismanagement of jalna women hospital in jalna district
दिवाळीच्या तोंडावर ST प्रवास महागणार, महामंडळाकडून भाडेवाढ जाहीर; 'या' गाड्यांना सूट

या प्रकरणातील सर्वात चिंतेची बाब म्हणजे सर्व मृतदेहांची विटंबना करण्यात आली असून त्यांचे मानवी अवयव काढण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून तपास अहवाल तयार करण्यास सांगितले आहे, जो तीन दिवसांत या कार्यालयास सादर केला येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com