Pakistan News : पाकिस्तानी सैन्याचा स्ट्राईक; तालिबानांच्या अड्ड्यावर ड्रोन हल्ला, ११ जणांचा मृत्यू

Pakistan Latest News : पाकिस्तानी सैन्याने तालिबान्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला. यानंतर एकच खळबळ उडाली.
Pakistan Latest News
Pakistan News Saam tv
Published On

पाकिस्तानी सैन्य दलाने केलेल्या ड्रोन हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अफगाणिस्तानच्या सीमेजवळील खैबर पख्तूनख्वामध्ये पाकिस्तानी सैन्याने तालिबान्यांवर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात महिला आणि मुलांसहित ११ जणांचा मृत्यू झाला.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने तालिबानींच्या अड्ड्यावर हल्ला केला. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या तीन ड्रोन हल्ल्यात ११ जणांनी जीव गमावला. सैन्यांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात दोन महिला आणि तीन लहान मुलांचा मृत्यू झाला.

एका लीक रिपोर्ट नुसार, पाकिस्तानातील तालिबान्यांनी पाकिस्तानी सैन्याला घेरलं. पाकिस्तानच्या तालिबान्यांनी सात सैन्यांना ठार केलं. तर सहा सैनिक जखमी झाले. तर चकमकीत आठ दहशतवाद्यांचा मृत्यू झाला.

Pakistan Latest News
Mumbai Accident : मुंबईच्या सेनापती बापट मार्गावर भीषण अपघात; टॅक्सी चालकासह दोघांचा जागीच मृत्यू

एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितलं की, पाकिस्तानात ऑपरेशन शुक्रवारी सकाळी सुरु झालं. पाकिस्तानातील हे ऑपरेशन सायंकाळपर्यंत सुरु होतं. अधिकाऱ्याने पुढे दावा केला की,'पाकिस्तान सैन्याने अनेक दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.

Pakistan Latest News
Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील मटण, मासे आणि शोरमाची दुकाने बंद करा; शिवसेना नेत्याची मागणी, कारण काय?

दरम्यान, पाकिस्तानी सरकार बलूचिस्तान आणि पख्तूनख्वा भागात अडचणींचा सामना करत आहे. बंडखोर उघडपणे पाकिस्तानी सैन्यांना आव्हान देत आहे. काही दिवसांपूर्वी बीएलएलच्या तरुणांनी जाफर एक्स्प्रेस नावाची ट्रेन हायजॅक केली होती. त्यानंतर संपूर्ण पाकिस्तान खळबळ उडाली होती.

पाकिस्तानचा माजी सीनेट सदस्य अहमद खान यांनी म्हटलं की, 'शिमोजो, कतलिंग आणि मर्दानमध्ये ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात निर्दोष महिला आणि लहान मुलांचा मृत्यू झाला. य घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो. पाकिस्तान सैन्य, ड्रोन हल्ला आणि स्वत:च्या दहशतवाद्यांच्या माध्यमातून निर्दोष नागरिकांची हत्या करत आहे. रमजान ईदच्या पूर्वसंध्येला रक्तरंजित हल्ला करणे चुकीचं आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com