

युद्धामुळे पाकिस्तानची दुर्दशा
पाकिस्तानकडून स्मार्ट लॉकडाऊनची घोषणा
लॉकडाऊननुसार रात्री ८ वाजल्यानंतर दुकाने बंद राहणार
पश्चिम आशियामध्ये मागील एका महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. जगातील विविध देशात युद्धामुळे थेट इंधन पुरवठ्यावर परिणाम होत आहे. इराण आणि इस्त्रायल-अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पाकिस्तानची दुर्दशा झाली आहे. इंधन पुरवठ्यात परिणाम झाल्याने पाकिस्तानवर 'स्मार्ट लॉकडाऊन'ची घोषणा करण्याची वेळ आली आहे.
पाकिस्तानात 'स्मार्ट लॉकडाऊन' लागू करण्यात आल्याने पंजाब, खैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान, इस्लामाबाद, गिलगित-बाल्टिस्तान आणि स्वतंत्र्य जम्मू आणि काश्मीर भागातील बाजार, दुकाने आणि शॉपिंग मॉल रात्री ८ वाजल्यानंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान मुहम्मद शहबाज शरीफ यांनी पेट्रोलियम उत्पादने, ऊर्जा संरक्षण या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित केली. पंजाब, खैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान, इस्लामाबाद, गिलगित-बाल्टिस्तान या भागातील दुकाने रात्री लवकर बंद केली जाणार आहेत.
खैबर पख्तूनख्वा सारख्या भागात बाजार, दुकाने आणि शॉपिंग मॉल रात्री ९ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. देशातील सर्व राज्य सरकारच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात आलाय. दररोज लागणाऱ्या वस्तूंची दुकाने, मॉल रात्री ८ वाजल्यानंतर बंद होणार आहेत.
बेकरी, रेस्टॉरंट, खानावळ रात्री १० वाजल्यानंतर बंद राहणार आहेत. लग्नाचे हॉल देखील रात्री १० वाजल्यानंतर बंद राहणार आहेत. या व्यतिरिक्त घरगुती कार्यक्रमांना देखील १० वाजेपर्यंत परवानगी असणार आहे. दवाखाने, औषधांची दुकाने यांच्यावर वेळेची मर्यादा नसणार आहे.
बैठकीत सिंध प्रांतातील बाजारांमध्ये होणाऱ्या व्यापाऱ्यांविषयी चर्चा करण्यात आली. सिंध प्रांत सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे.पंतप्रधानांनी दिलेल्या माहितीनुसार, गिलगित , मुजफ्फराबाद शहरात सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्यांकडून एका महिन्यांसाठी शुल्क आकारले जाणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.