Pakistan Election 2024: पाकिस्तानात मतदानादरम्यान दहशतवाद्यांचा पोलिसांच्या वाहनावर हल्ला, दोन ठार

Pakistan News: बलुचिस्तानमध्ये मतदानादरम्यान पोलिसांच्या वाहनाला बॉम्बने लक्ष्य करण्यात आल्याचे वृत्त आहे. ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
Pakistan News
Pakistan NewsSaam Tv

Pakistan Election 2024 :

पाकिस्तानमध्ये आज नवीन सरकार निवडण्यासाठी मतदान होत आहे. मात्र या काळातही येथे अस्थिरता आणि हिंसाचार सुरूच असल्याचं दिसत आहे. यातच येथी बलुचिस्तानमध्ये मतदानादरम्यान पोलिसांच्या वाहनाला बॉम्बने लक्ष्य करण्यात आल्याचे वृत्त आहे. ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. वृत्तानुसार, स्फोटानंतर दहशतवाद्यांनी सुमारे अर्धा तास गोळीबार केला.

याशिवाय खैबर पख्तुनख्वामध्येही बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. येथे एकाचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. येथे कथित दहशतवादी हल्ल्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. तसेच बलुचिस्तानमधील हल्ल्यात जीव गमावलेले दोघेही सुरक्षा दलाचे कर्मचारी होते. बलुचिस्तानमध्येही 9 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Pakistan News
Delhi Farmers Protest: शेतकरी आंदोलन पुन्हा पेटलं! बॅरिकेड तोडून हजारोंच्या संख्येने शेतकरी नोएडाहून दिल्लीत दाखल, VIDEO

बुधवारीही झाले होते बॉम्बस्फोट

निवडणुकीपूर्वी बुधवारीही बलुचिस्तानमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पहिला स्फोट पिशीन शहरात झाला. ज्यात सुमारे 12 लोकांचा मृत्यू झाला तर, 25 जण जखमी झाले. यानंतर येथील किला सैफुल्ला शहरात दुसरा स्फोट झाला. दोन्ही घटनांमध्ये एकूण 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यांचे सूत्रधार तालिबानी दहशतवादी असल्याचं सांगण्यात येत आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाकिस्तान करत आहे गंभीर संकटाचा सामना

पाकिस्तान दीर्घ काळापासून राजकीय आणि आर्थिक संकटाचा सामना करत आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. दरम्यान, निवडणुकीत नवाझ शरीफ पुन्हा सत्तेत येण्याची जोरदार चर्चा आहे. तीन वेळा पंतप्रधान राहिलेले नवाझ शरीफ गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच देशात परतले. त्यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) विजयाचा पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे. . (Latest Marathi News)

Pakistan News
Konkan Politics: राज ठाकरे यांनी कोकणातील माजी आमदाराची पक्षातून केली हकालपट्टी, नेमकं कारण काय?

मतदानापूर्वी पाकिस्तानने यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीच्या दिवशीही घडलेल्या अशा घटनांवरून त्यांच्या दाव्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. अशा घटना टाळण्यासाठी पाकिस्तान सरकारने मतदानादरम्यान मोबाईल इंटरनेट ब्लॉक केले आहे. यासोबतच इराण आणि अफगाणिस्तानची सीमाही बंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com