Delhi Farmers Protest: शेतकरी आंदोलन पुन्हा पेटलं! बॅरिकेड तोडून हजारोंच्या संख्येने शेतकरी नोएडाहून दिल्लीत दाखल, VIDEO

Farmers Protest News: देशात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन पेटताना दिसत आहे. आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी संसदेकडे मोर्चा काढला आहे.
Delhi Farmers Protest
Delhi Farmers ProtestSaam Tv
Published On

Delhi Farmers Protest:

देशात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन पेटताना दिसत आहे. आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी संसदेकडे मोर्चा काढला आहे. मात्र पोलिसांनी त्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापूर्वीच नोएडा सीमेवर थांबवलं आहे. हजारोंच्या संख्येने शेतकरी जमल्याने नोएडामध्ये अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झाले आहे.

पोलिसांनी अडवल्यानंतर शेतकऱ्यांनी येथील महामाया उड्डाणपुलावरील बॅरिकेड्स तोडून दिल्लीकडे मोर्चा वळवला आहे. आंदोलनात शेतकऱ्यांसह उपस्थित महिलांनीही बॅरिकेड्स तोडून पुढे वाहत आहेत. आता चिल्ला सीमेवर शेतकरी जमा झाले आहेत.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Delhi Farmers Protest
Konkan Politics: राज ठाकरे यांनी कोकणातील माजी आमदाराची पक्षातून केली हकालपट्टी, नेमकं कारण काय?

नोएडा पोलिसांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, किसान चौक आणि इतर ठिकाणांशी जोडलेल्या सर्व सीमांवर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. महामाया उड्डाणपुलावर शेतकरी बॅरिकेड्स तोडून पुढे सरसावले असल्याची माहिती मिळत आहे. सध्या चिल्ला हद्दीत शेतकऱ्यांचा मेळावा सुरू आहे. त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नोएडा पोलिसांनी सांगितले की, ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

दरम्यान याआधी बीकेपी नेते सुखबीर यादव खलिफा यांनी आधीच सांगितले होते की, शेतकरी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी महामाया उड्डाणपुलावरून दिल्लीतील संसदेकडे मोर्चा काढतील. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महामाया उड्डाणपुलावर आधीच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. बॅरिकेड्सही लावण्यात आले होते.

Delhi Farmers Protest
Lok Sabha Election: मोठी बातमी! ठाकरे गटाचा महाराष्ट्रात लोकसभेसाठी पहिला उमेदवार ठरला

ग्रेटर नोएडामधील शेतकरी डिसेंबर 2023 पासून स्थानिक विकास अधिकाऱ्यांनी अधिग्रहित केलेल्या त्यांच्या जमिनीच्या बदल्यात वाढीव भरपाई आणि भूखंड विकसित करण्याच्या मागणीसाठी निषेध करत आहेत.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?

  • एनटीपीसीच्या नुकसानभरपाईबाबत धोरण स्वीकारावे.

  • नोकऱ्या देण्याचे आश्वासन पूर्ण करावे.

  • नोएडा प्राधिकरणाने 10 टक्के भूखंड परत घेतल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

  • अंसल बिल्डरने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही, ती मिळावी.

  • एमएसपीची हमी देणारा कायदा लागू करावा. या शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com