Pahalgam Terror Attack : इतना सन्नाटा क्यू हैं भाई! पाक बॉर्डवरील गावातील मशि‍दीत स्पीकरचा आवाज बंद, सीमेवर पहिल्यांदाच एवढा 'सन्नाटा'

What is Happening in Pakistan Border Villages? : पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले. मात्र, भारत अजून आक्रमकपणे उत्तर देईल अशी पाकिस्तानला भीती वाटत आहे.
Pakistan Border Village Mosque
Pakistan Border Village MosqueSaam Tv News
Published On

जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा हृदयद्रावक मृत्यू झाला आहे. यानंतर भारत सरकारने आक्रमक पावलं उचलत मोठे निर्णय घेतले आहेत. भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. या शिवाय पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगण्यात आलं. पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले. मात्र, भारत अजून आक्रमकपणे उत्तर देईल अशी पाकिस्तानला भीती वाटत आहे. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सैन्य दलांना फ्री हँड देण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील सीमावर्ती भागातील गावांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे.

भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळ जम्मूच्या आर.एस. पुरा सेक्टरमध्ये शेवटचं गाव सुचेतगड आहे. या गावात भारतीय शेतकरी सुगीच्या कामात व्यस्त आहेत. दुसरीकडे पाकिस्तानच्या बाजूला असलेल्या गावात देखील शांतता आहे. पाकिस्तानच्या भागात कोणतीही हालचाल दिसत नाहीय. ना शेतामध्ये कोणती काम होत आहे तर लष्करी कारवाईच्या भीतीने पाकिस्तानच्या सीमेकडील भाग निर्मनुष्य झाले आहेत.

Pakistan Border Village Mosque
Pahalgam Pakistan: कंगाल पाकिस्तानचं नसतं धाडस! भारतीय सीमेजवळ रणगाडे, फायरिंगचाही सराव; पायावर कुऱ्हाड मारून घेणार

सुचेतगडमधील स्थानिक ग्रामस्थांच्या दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकिस्तानच्या सीमेकडील भागात मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु होत्या. तिकडचे शेतकरी त्यांच्या शेतात नियमितपणे काम करत होते. त्यांच्याकडील पाळीव प्राणी भारतीय सीमेजवळ आणायचे. आता परिस्थिती बदलली आहे. गावच्या सरपंचांनी सांगितलं की 'आम्ही पहिल्यांदा पाहतोय की पाकिस्तानच्या मशिदीतून अजाणचा आवाज येणं बंद झालं आहे. यापूर्वी कारगिल युद्धावेळी तसं झालं होतं.'

गावकऱ्यांच्या माहितीनुसार आर.एस पुरा सेक्टरच्याबरोबर समोर पाकिस्तानचं सियालकोट हे क्षेत्र आहे. सुचेतगड पासून ते काही किलोमीटर अंतरावर आहे. या क्षेत्रात कजरियल, ऊंची बैंस, कसीरे आणि गूंग यासारखी गावं ओसाड पडली आहेत.

Pakistan Border Village Mosque
मुंबईतून गावाकडे जाताच आयुष्य संपवलं, आई अन् बहिणीनं विषाचा घोट घेतला, संपूर्ण कुटुंबाचा अंत; काही वर्षापूर्वी...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com