
Pakistan Airstrike Afghanistan: अफगानिस्तानची राजधानी काबुलमध्ये पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानाने हल्ला केला. तालीबानचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला. त्यांनी रागाच्या भरात अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला. रात्री लडाऊ विमानातून TTP प्रमुख नूर वली महसूद यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यानंतर काबुलमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अफगाणिस्तानकडून पाकिस्तानच्या हल्ल्याचे कसे प्रत्युत्तर दिले जातेय, याकडे भारताचे लक्ष लागलेय. पण अफगाणिस्तानवर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली आहे.
अफगाणिस्तानची राजधानी काबुल रात्री हवाई हल्ल्याने हादरली. पाकिस्तानच्या एअर फोर्सने केलेल्या एअरस्ट्राईकमुळे काबुलमध्ये हाहाकार उडाला होता. पाकिस्तानी मिडिया रिपोर्ट्सनुसार, या हवाई हल्ल्यामध्ये टीटीपी प्रमुख नूर वली महसूद यांचा मृत्यू झाला आहे. पण तालिबान प्रमुख महसूद यांनी या अफवा असून आपण सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी भारत दौऱ्यावर असताना हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. Kabul airstrike Pakistan TTP chief Nur Wali Mehsud death rumors
तालिबान प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी सोशल मिडिया या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली. X वर पोस्ट करत त्यांनी म्हटले की, "काबूल शहरात स्फोटाचा आवाज ऐकू आला. कोणालाही काळजी करण्याची गरज नाही, सर्व काही ठीक आहे, घटनेची चौकशी सुरू आहे आणि आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही."
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी धमकी
गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगास्तानला उघड इशारा दिला होता. पाकिस्तानविरोधी दहशतवादी कारवायांसाठी अफगाणिस्तानमध्ये कटकारस्थाने रचली जात असतील, तर कठोर कारवाई केली जाईल. आसिफच्या धमकीनंतर पाकिस्तानने हे हवाई हल्ले केलेत. अफगाणिस्तान तहरीक-ए-तालिबानला आश्रय देत असल्याचा आरोप आसिफ यांनी केला होता.
भारत-अफगाणिस्तान संबंधामुळे पाकिस्तानचा तिळपापड ?
भारत आणि अफगाणिस्तानमधील वाढत्या संबंधांमुळे पाकिस्तान अस्वस्थ होत असल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय पातळीवर बांधला जातोय. ख्वाजा आसिफ यांनी तर अफगाणिस्तानला भारताचा अनुयायी आणि पाकिस्तानचा शत्रू घोषित केलेय. अफगाणिस्तानच्या लोकांवर टीका करताना ख्वाजा म्हणाले की, भूतकाळात असो, वर्तमानात असो किंवा भविष्यात असो, अफगाण नेहमीच भारताशी एकनिष्ठ राहिले आहेत आणि पाकिस्तानला विरोध करत आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.