
पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय. दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर भारतीय सुरक्षा दल अॅक्शन मोडवर आले असून जागोजागी नाकाबंदी आणि शोधमोहीम राबवण्यात येत आहे. अत्यंत दक्षतेने शोध मोहीम राबविली जातेय. या कारवाई अंतर्गत अनंतनाग जिल्ह्यातील विविध ठिकाणी अनेक छापे टाकण्यात आले. त्या कारवाईत आतापर्यंत सुमारे १७५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणारे नेटवर्क उध्वस्त करण्यासाठी त्यांची चौकशी केली जातेय. या कारवाई बाबत माहिती देताना अनंतनागमधील पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, अनंतनाग पोलीस जिल्ह्याच शांतता प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध आहे. जो कोणी जिल्ह्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा डाव मोडून काढू. जिल्ह्यातील कोणत्या भागात दहशतवादी लपून बसले असतील त्यांना शोधण्यात येईल.
तसेच जिल्ह्यात सुरक्षित आणि शातंतेचं वातावरण निर्माण करू, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलंय. सुरक्षा अधिक वाढविण्यासाठी, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त मोबाईल वाहन तपासणी नाके (MVCP) स्थापन करण्यात आली आहेत. नागरिकांना काही संशयास्पद हालचाली आढळली तर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी असे आवाह पोलिसांनी राज्यातील नागरिकांना केलंय.
दरम्यान २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसरन मैदानात पर्यटकांवर गोळीबार केला होता. यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. यात २५ भारतीय आणि एका नेपाळमधील एका व्यक्तीचा समावेश होता. या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने कडक बंदोबस्त करत सुरक्षा व्यवस्था वाढवलीय. घनदाट जंगली भागात जिथे अतिरेकी लपत असतात त्या ठिकाणी पोलिसांनी गस्त आणि अॅम्ब्यूश ऑपरेशन्स वाढवलेत.
याचदरम्यान राजौरी परिसरात सुरक्षा दलाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. जम्मू-राजौरी-पुंछ या राजमार्गावरील वाहनांची तपासणी केली जात आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेंदी यांनी शुक्रवारी श्रीनगर येथील सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.