Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू, मृतांच्या नावांची यादी समोर

Names of 26 Victims from Pahalgam Terror Attack Revealed: पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. या सर्व मृतांची नाव समोर आली आहे. या संपूर्ण लिस्ट पाहा एका क्लिकवर...
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू, मृतांच्या नावांची यादी समोर
Names of 26 Victims from Pahalgam Terror Attack RevealedSaam Tv
Published On

जम्मू-काश्मिरच्या पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ४ दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरवून टाकला. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला आणि त्यानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांचा बळी घेतला. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत.

दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. सर्वजण सैरावैरा पळू लागले. घाबरलेल्या पर्यटकांनी लपण्याचा प्रयत्न केला पण दहशतवाद्यांनी त्यांना धर्म विचारला त्यानंतर त्यांच्यावर बेछूट गोळ्या झाडल्या. डोक्यावर, छातीवर, पाठीवर गोळ्या झाडून दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या केली. पहलगाममध्ये सगळीकडे रक्ताचे पाट वाहत होते.

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू, मृतांच्या नावांची यादी समोर
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू, राज्यभरात हळहळ

या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या २६ पर्यटकांच्या नावाची यादी समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांची समावेश आहे. पुण्यातील दोन पर्यटक, डोंबिवलीतील तीन पर्यटत आणि नवी मुंबईतील एका पर्यटकाचा या हल्ल्यात मृत्यू झाला. आपल्या कुटुंबीयांच्या डोळ्यासमोरच दहशतवाद्यांनी या २६ जणांची हत्या केली. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी फक्त पुरूषांनाच टार्गेट केले. या हल्ल्यात सर्व महिला सुरक्षित आहेत. जम्मू -काश्मिरच्या पहलगाममध्ये कुटुंबीयांसोबत सुट्ट्या इन्जॉय करण्यासाठी आले असता ही भयानक घटना घडली.

मंगळवारी दुपारी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. बैसरन खोऱ्यात मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित असताना हा भ्याड दहशतवादी हल्ला झाला. मृतांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील पर्यटकांचा समावेश आहे. नेपाळ आणि युएईमधील प्रत्येकी एक पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला.

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू, मृतांच्या नावांची यादी समोर
Pahalgam Terror Attack : ती ठरली आयुष्यातील शेवटची सहल; दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील कुटुंबाचा आधारवड हरपला

पहलगाम हल्ल्यातील मृतांची यादी -

१) सुशिल नाथयाल - इंदुर

२) हेमंत जोशी - डोंबिवली, महाराष्ट्र

३) सय अदील हुसैन शाह - पहलगाम

४) विनय नरवाल - हरियाणा

५)अतुल मोने- डोंबिवली, महाराष्ट्र

६) निरज उधवाणी - कोलकाता

७) बिटन अधिकारी - कोलकाता

८) कुशल राज निओपाने - नेपाळ

९) शुभम द्विवेदी - कानपूर, उत्तर प्रदेश

१०) प्रशात कुमार सातपाठी - ओडिशा

११)मनिष राजन - बिहार

१२) एन रामचंद्रा - कोची, केरळ

१३) संजय लेले - डोंबिवली, महाराष्ट्र

१४) दिनेश अग्रवाल - छत्तीसगड

१५)समीर गुहार - कोलकाता

१६) दिलीप देसले - पनवेल

१७) जे सचेंद्र मोली - विशाखापट्टणम

१८) मधुसुदन सोमीशेट्टी - बंगळुरू

१९) संतोष जगदाळे - पुणे, महाराष्ट्र

२०) मंजूनाथ राव - कोलकाता

२१) कौस्तुभ गनबोटे- पुणे, महाराष्ट्र

२२)भरत भूषण - बंगळुरू

२३) सुमित परमार - गुजरात

२४) यतेश परमार - गुजरात

२५) तागेहालिंग - अरुणाचल प्रदेश

२६) शैलेशभाई कलाठिया - गुजरात

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू, मृतांच्या नावांची यादी समोर
Pahalgam Terror Attack : ती ठरली आयुष्यातील शेवटची सहल; दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील कुटुंबाचा आधारवड हरपला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com