
उत्तर भारतातील काही राज्यात कडाक्याची थंडी पसरली आहे. त्यातच धुक्यामुळे दिल्लीसहित काही राज्यात विमान सेवा प्रभावित झाल्या आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे हवामान विभागाकडून दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या राज्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)
उत्तर भारतातील बऱ्याच राज्यात थंडीची लाट पसरली आहे. या भागात थंडीच्या लाटेमुळे दाट धुके व ढगाळ वातावरण आहे. दिल्लीत सकाळी दाट धुके असल्याने लोकांना ५० मीटर अंतरावरचे देखील दिसत नव्हतं. दिल्लीत आणखी काही दिवस दाट धुके राहण्याची शक्यता आहे. दाट धुक्यामुळे हवामान विभागाने दिल्लीसाठी ऑरेंज अलर्ट तर पंजाब आणि हरियाणासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
हवामान विभाग तीन प्रकारचे अलर्ट जारी करते. यात यलो, ऑरेंज आणि रेड अलर्टचा सामावेश आहे. हे तिन्ही अलर्ट तीन वेगवेगळ्या वेळी जारी केले जातात.
शहरातील वातावरणात बदल झाला. खराब हवामानामुळे लोकांना घराबाहेर पडणेही अवघड असते. तेव्हा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. या वातावरणात लोकांना घराबाहेर पडणंही मुश्किल असतं.
हवामान विभागाकडून यलो अलर्ट हा सतर्क राहण्यासाठी जारी करण्यात येतो. या अलर्टचा मुख्य उद्देश हा लोकांना अलर्ट करणे असतो. वातावरण खूप खराब झाल्यास त्यासाठी तयार राहावे लागेल. तसेच हा अलर्ट जारी झाल्यास हवामानाची सातत्याने माहिती घेत राहावं लागतं, असा या अलर्टचा उद्देश आहे.
हवामान विभाग हा अलर्ट जारी केल्यानंतर लोकांचं खूपच नुकसान शक्यता असते. मुसळधार पाऊस,वादळ आणि दाट धुके आणि ढगफुटी झाल्यास रेड अलर्ट जारी करण्यात येतो. या रेड अलर्टदरम्यान लोक मृत्यूमुखी पडण्याची शक्यता असते.