Operation Sindoor Air Strike: पाकिस्तान हादरला! ऑपरेशन सिंदूरनंतर घेतला मोठा निर्णय

Pakistan Airlines Closed After Operation Sindoor: पहलगाममधील हल्ल्याने भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील सर्व विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत.
Pakistan Airlines Closed After Operation Sindoor
Pakistan Airlines Closed After Operation SindoorSaam Tv
Published On

भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत हल्ला केला आहे. पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला आहे. भारताने पाकिस्तान व पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये ऑपरेशन हिंदू राबवले. पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला आहे. यानंतर आता पाकिस्तानमध्ये विमानसेवा पूर्णपणे बंद करण्याने करण्यात आली आहे.

Pakistan Airlines Closed After Operation Sindoor
Operation Sindoor: हिंदूंना बायकोसमोर गोळ्या झाडल्या,भारताने दिलं चोख प्रत्युत्तर; पाकिस्तानवरच्या हल्ल्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर' नाव का निवडलं?

एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान पूर्णपणे घाबरला आहे. पाकिस्तानला या सगळ्याचीच चाहूलदेखील नव्हती. रात्रीच्या अंधारात भारताने हे ऑपरेशन केले आहे. याचा परिणाम भारतासह संपूर्ण जगभरात होताना दिसत आहे. यानंतर आता पाकिस्तानची विमानसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. याचसोबत उत्तर भारतातीलदेखील विमानसेवा बंद करण्यात आली आहे.

भारतातील एअरपोर्टदेखील बंद

अमृतसर एअरपोर्ट बंद (Amritsar Airport Closed)

श्री गुरु राम दास जी इंटरनॅशनल एअरपोर्ट बंद करण्यात आले आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत हे एअरपोर्ट बंद असणार आहे. या विमानतळावरुन एकही विमान उडणार नाहीये. भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कतार एअरलाइन बंद (Qatar Airline Shut)

कतार एअरलाइनने पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या सर्व फ्लाइट रद्द केल्या आहे.पाकिस्तानमधील सर्व परिस्थितीवर एअरलाइनचे लक्ष आहे.कर्मचारी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतातील हे एअरपोर्ट बंद

ऑपरेशन सिंदूरनंतर भारतातीलदेखील काही एअरपोर्ट बंद करण्यात आले आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. धर्मशाला, लेह, जम्मू श्रीनगर, अमृतसर, चंदीगढ हे एअरपोर्ट बंद करण्यात आले आहेत. याचसोबत इंडिगोने जम्मू, लेह, चंदीगढ, श्रीनगर, अमृसतसर, बिकानेर, जोधपूर, धर्मशाला या ठिकाणी जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या सर्व फ्लाइट रद्द केल्या आहेत.

Pakistan Airlines Closed After Operation Sindoor
Operation Sindoor: त्यांनी आमचं कुंकू पुसलं, 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव योग्य; पुण्यातील जगदाळे कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com