Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर; भारतीय नारीचं पाकिस्तानला थेट उत्तर| VIDEO

After Pahalgam Attack: पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 महिलांच्या पुसलेल्या सिंदूरचा बदला घेतला... एवढंच नाही तर भारतीय नारी सब पे भारी म्हणत त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिलीय...हवाई दलाच्या प्रेस ब्रिफींगमध्ये काय घडलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये....
operation sindoor
operation sindoorsaam tv
Published On

एअर स्ट्राईक करत पहलगाम हल्ल्याचा बदला भारतानं अखेर घेतला.....हे तर झालं प्रत्यक्ष पाकिस्तानला दिलेलं उत्तर...पण भारतानं या हल्ल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतून पाकिस्तानला पुन्हा चांगलीच चपराक लगावलीये..कारण ऑपरेशन सिंदूरसंदर्भात महिला लष्करी अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सर्वांचेच डोळे अभिमान आणि कौतुकाने भरले होते...प्रेस ब्रिफींगसाठी आलेल्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमीका सिंग यांचं कौतुक होतंय....

पहलगाम इथे झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला....कलमा पढायला सांगितला...इतकच नाही तर त्यांनी खतना केलाय की नाही हेही पाहीलं....अर्थात देशात धर्माच्या नावावर दहशत पसवरणं...हिंदू मुसलमान द्वेष वाढवणं हाच या हल्ल्यामागचा मुख्य हेतू...

हिंदू आणि मुसलमानांची संस्कृती वेगळीये...ते दोघं कधीही आनंदाने एकत्र राहू शकत नाही अशी गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानला ही चपराक होती...कारण सोफिया कुरेशी एक मुसलमान उच्चपदस्थ लष्करी अधिकारी आहेत आणि दहशतवादाविरोधातील या लढ्यात तिचं नेतृत्व बरंच काही सांगून जातंय...सोफिया कुरेशी यांची 1999 मध्ये भारतीय सैन्य दलात एन्ट्री झाली. त्यांनी 1999 मध्ये त्यांनी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून प्रशिक्षण घेतलं आहे. मेकॅनाइज्ड इन्फंट्रीचे आर्मी ऑफिसर मेजर ताजुद्दीन कुरेशी यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे. तर दुसरी महिला अधिकारी विंग कमांडर व्योमीका सिंग यांनी एकूण 2500 तासांहून अधिक उड्डाण केलं आहे. त्यांनी जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील कठीण परिस्थितीत चेतक आणि चीता सारखी हेलिकॉप्टर हाताळली आहेत. अनेक बचाव मोहिमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पहलगाम हल्ल्यात वेचून वेचून हिंदूंना ठार केलं...त्यातही महिलांना, मुलांना न मारता पुरुषांना मारलं...अनेक महिलांचं कुंकू पुसलं...पण जेल्हा ऑपरेशन सिंदूरचं प्रेस ब्रिफिंग समोर आलं तेव्हा भारतातली नारी शक्ती तुम्ही समजता तशी कमजोर नाही तर तुमच्या कल्पनेपेक्षाही मजबूत आहे...आणि तेही धर्मनिरपेक्षपणे.... असा थेट संदेश पाकिस्तानला देण्यात आलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com