Parliament Monsoon Session: 'ऑपरेशन सिंदूर' का थांबवलं? परत सुरू होणार का ऑपरेशन? संरक्षण मंत्र्यांनी लोकसभेत दिलं उत्तर

Operation Sindoor Discussed in Lok Sabha: देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत होणाऱ्या ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिलं. ऑपरेशन का रद्द करण्यात आलं ? परत सुरू केलं जाणार का? अशा प्रश्नांना संरक्षण मंत्र्यांनी उत्तर दिलंय.
Parliament Monsoon Session
Operation Sindoor Discussed in Lok Sabhasaam tv
Published On

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत चर्चेला सुरुवात झालीय. 'ऑपरेशन सिंदूर' हे सैन्याच्या तिन्ही सेवांचे एक अतुलनीय उदाहरण आहे. पाकिस्तानच्या कुरघोडीवर भारतीय लष्कराने जोरदार उत्तर दिलं. तसेच हे ऑपरेशन कोणाच्या दबावा खाली थांबवण्यात आलं नाही, तर आपलं टार्गेट पूर्ण झाल्यामुळे थांबवण्यात आलं, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेत उत्तर देताना स्पष्टपणे सांगितले. टार्गेट पूर्ण झाल्यामुळे थांबवण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू केलं जाईल. असेही राजनाथ सिंह यावेळी म्हणालेत.

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केलं. परंतु अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करण्यात आली. त्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारताने का कारवाई केली? ऑपरेशन का थांबवण्यात आलं?

पंतप्रधान मोदी आणि सरकारमधील नेते एका बाजुला आपला विजय झाल्याचं सांगतात तर दुसऱ्या बाजुला ऑपरेशन सिंदूर थांबवलं नसल्याचं सांगतात. त्यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं होतं. ऑपरेशन सिंदूरवर चर्चा केली जावी, अशी मागणी कॉग्रेस इतर विरोधीपक्षांनी केली होती.

विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, जर पाकिस्तानकडून पुन्हा अशी कुरघोडी किंवा देशविरोधी कारवाई करण्यात आली तर भारत पुन्हा ऑपरेशन सिंदूर सुरू करेल. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य केलं होतं. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानाच पराभव झालाय.त्यांचा आत्मविश्वास पुर्णपणे तुटलाय.

यावेळी विरोधकांना आवाहन करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, तुम्हाला प्रश्न करायचा असेल तर असा विचारा की, ज्या दहशतवाद्यांनी आपल्या बहिणींचे, मुलींचं कुंकू पूसलं, त्याचा बदल आपल्या सैन्याने ऑपरेशन सिंदूरमधून घेतला का? तर त्याचे उत्तर हो आहे.

आपले ऑपरेशन हे पूर्णपणे यशस्वी झाले. सैन्याने त्यांचे लक्ष्य साध्य केलंय. तसेच आम्ही कोणत्याही दबावाखाली ऑपरेशन थांबवले नाही तर शत्रूच्या प्रत्येक योजनेला हाणून पाडले. आमचा हेतू हा युद्ध सुरू करण्याचा नव्हता. तर दहशतवाद्यांच्या स्थळांना उद्धवस्त करणं होतं. ते लक्ष्य भारतीय सैन्याने फक्त २२ मिनिटाच्या ऑपरेशनमध्ये पूर्ण झाल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ शिंह म्हणाले.

Parliament Monsoon Session
ऑपरेशन सिंदूरवर आज चर्चा, अधिवेशन तापणार; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार | Operation Sindoor

'ऑपरेशन सिंदूर' हे पाकिस्तानने विनंती केल्यानंतर आणि DGMOच्या पातळीवर चर्चा झाल्यानंतर थांबण्यात आले. पाकिस्तान आपल्या एकही ठिकाणाला नुकसान करू शकला नाही. हे सांगताना राजनाथ सिंह यांनी विरोधकांना टोमणा मारला. विरोधकांनी इतर प्रश्न केले पण शत्रूंचे किती लढाऊ विमाने पाडली याची विचारणा त्यांनी केली नाही.

Parliament Monsoon Session
Operation Mahadev : लष्कराचं 'ऑपरेशन महादेव' फत्ते; ३ दहशतवादी ठार, पहलगाम हल्ल्याचे संशयित असण्याची शक्यता

दरम्यान ऑपरेशन सुरू करण्याआधी सरकारने सर्व बाजूंची विचार केला होता. दहशतवाद्यांशिवाय सामन्य नागरिकांना इजा होता कामा नये, असं ठरवण्यात आलं होतं. दरम्यान 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये १०० पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले, असंही संरक्षणमंत्री म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com