
ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमन सध्या चॅट जीपीटीनंतर त्यांच्या लग्नामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सॅम ऑल्टमन यांनी अलिकडेच त्यांचा मित्र आणि समलैंगिक प्रियकर ऑलिव्हर मुल्हेरिनशी लग्न केले. सॅम अल्टमन आणि ऑलिव्हर मुल्हेरिन हे दिर्घकाळ रिलेशनमध्ये होते. अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांचे फोटो माध्यमांवर व्हायरल होत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ओपन एआयचे (OpenAI) संस्थापक सॅम ऑल्टमन (Sam Altman) आणि त्यांचा मित्र समलैंगिक प्रियकर ऑलिव्हर मुल्हेरिन (Oliver Mulherin) हे लग्नबंधनात अडकले आहेत. सॅम आणि ऑलिव्हर यांचा सोहळा त्यांचे कुटुंबीय आणि मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडला. बुधवारी (१०, जानेवारी) हवाईमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.
या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकरीही चकित झाले. अनेकांनी हे AI जनरेटेड फोटो असल्याचा दावा केला होता. मात्र स्वतः सॅम ऑल्टमन यांनी या लग्नाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. तसेच ऑलिव्हर मुल्हेरिनने याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
वर्षभरापुर्वी दिली होती माहिती..
दरम्यान, सॅम आणि ओली यांची मैत्री खूप जुनी आहे. ओली यांनी मेलबर्न विद्यापीठातून सॉफ्टवेअर अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली आहे. ओलीच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्याने मेटामध्ये 2 वर्षे काम केले आणि नोव्हेंबर 2022 मध्ये कंपनी सोडली. इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) क्षेत्रात ओली यांनी प्राविण्य मिळवले आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.