Priya More
बॉलिवूडचा मिस्टर 'परफेक्शनिस्ट' आमिर खानची लाडकी लेक आयरा खान अखेर विवाहबंधनात अडकली.
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचा उदयपूरमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला.
3 जानेवारीला मुंबईमध्ये कोर्ट मॅरेज केल्यानंतर 10 जानेवारीला या कपलने उदयपूरमध्ये धुमधडाक्यात लग्न केले.
आयरा आणि नुपूरचे महाराष्ट्रीय पद्धतीने लग्न होणार असल्याचे बोलले जात होते. पण ना हिंदू, ना मुस्लिम तर ख्रिश्चन पद्धतीने या कपलने लग्न केले.
आयरा आणि नुपूरच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचे वेडिंग फंक्शन तीन दिवस चालले. या वेडिंग फंक्शनमध्ये दोघांच्याही कुटुंबीयांनी आणि मित्र परिवारांनी खूप धम्माल केली.
मेहंदी, संगीत सिरेमनीनंतर 10 जानेवारीला हे कपल ख्रिश्चन पद्धतीने विवाहबंधनात अडकले.
आयरा खानने व्हाइट कलरचा गाऊन परिधान केला होता. यामध्ये ती खूपच क्यूट दिसत होती.
नुपूर शिखरेने क्रीम कलरचा ब्लेझर सूट परिधान केला होता. यामध्ये तो खूपच हँडसम दिसत होता.
लग्नाचे फोटो व्हायरल होताच या कपलवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.