One Nation One Election : 'एक देश एक निवडणूक' विधेयक लोकसभेत उद्या होणार सादर; काय आहेत फायदे?

One Nation One Election News : एक देश एक निवडणूक' विधेयक लोकसभेत उद्या मंगळवारी सादर केला जाणार आहे. यासाठी भाजपने तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. या विधेयकाचे फायदे जाणून घेऊयात.
One Nation, One Election News
One Nation, One ElectionSaam tv
Published On

नवी दिल्ली : 'एक देश एक निवडणूक' विधेयकाबाबत महत्वाची माहिती हाती आली आहे. 'एक देश एक निवडणूक' ही घटनादुरुस्ती मंगळवारी दुपारी लोकसभेत सादर केली जाणार आहे. कायदे मंत्री अर्जुन मेघवाल हे लोकसभेत ही घटनादुरुस्ती मांडणार आहेत. या घटनादुरुस्तीची माहिती आधीच खासदारांना देण्यात आली आहे. तसेच या घटनादुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सत्ताधारी खासदारांना तीन ओळीचा व्हिप जारी केला आहे.

संसदेचं हिवाळी अधिवेशन २० डिसेंबर रोजी समाप्त होणार आहे. जर उद्या म्हणजे १७ डिसेंबर रोजी घटनादुरुस्ती सादर केली नाही, तर सरकारकडे चर्चेसाठी फक्त तीन दिवस राहतील. तसेच चर्चा अशी आहे की, घटनादुरुस्ती संसदेत मांडल्यानंतर सर्वांची मान्यता मिळवण्यासाठी संयुक्त संसद समितीला पाठवण्यात येऊ शकते.

One Nation, One Election News
Maharashtra Politics : भाजप प्रदेशाध्यक्षांनी रामदास आठवलेंची मागितली माफी; नेमकी काय चूक झाली?

केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल हे मंगळवारी लोकसभेत दोन विधेयक सादर करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र करण्याच्या घटनादुरुस्तीला १२ डिसेंबर रोजी मंजुरी दिली होती. या घटनादुरुस्तीमुळे केंद्र सरकारच्या निवडणूक खर्च कमी होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

One Nation, One Election News
Maharashtra Politics: पाच खासदार फोडा, एक मंत्रिपद मिळवा; भाजपची अजित पवार यांना ऑफर, संजय राऊतांचा दावा

मंत्रिमंडळाने दोन विधेयकाला मंजुरी दिली होती. यामध्ये लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा एकत्र घेणे आणि तीन केंद्र शासीत प्रदेशांच्या निवडणुका एकत्र घेणे, असे दोन घटनादुरुस्ती मांडण्यात येणार आहे. संसदेत घटनादुरुस्ती पास करण्यासाठी दोन तृतियांश बहुमत गरजचे असते. दुसऱ्या विधेयकासाठी सामान्य बहुमताची आवश्यकता आहे.

One Nation, One Election News
Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप घडणार? काका-पुतण्यात दिल्लीत दिलजमाई? VIDEO

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वातील एक उच्चस्तरीय समितीने लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासहित महापालिका आणि ग्राम पंचायतीच्या निवडणुकाही एकत्र घेण्याविषयी प्रस्ताव दिला होता. मात्र, मंत्रिमंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मुद्दा दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com