Golden Temple Theft : अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात चोरी; देणगी काउंटरमधून पळवले लाखो रुपये

Golden Temple : सुवर्ण मंदिरात चोरीची घटना घडलीय. देगणी देण्याचा बहाणा करत चोरट्याने दानपेटीतून लाखो रुपयांची रक्कम पळवलीय. याप्रकरणी चार संशयितांविरोधात तक्रार नोंदवण्यात आले आहे.
Theft In Golden Temple
Theft In Golden TempleSaam Tv
Published On

Theft In Golden Temple:

अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातील लाखो रुपयांची चोरी झाल्याची घटना घडलीय. गुरु नानक जयंतीच्या एक दिवसाआधी चोरीची घटना घडलीय. दरम्यान चोरीची घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद घ्यावी आणि या चोरीचा तपास करावं अशी गोल्डन टेम्पलमधील कर्मचाऱ्यांनी केलीय. तसेच चार संशयितविरोधात तक्रार नोंदवण्यात आलीय. (Latest News)

चोरीची घटना (श्री हरमदिंर साहिब गुरुद्वारा ) गोल्डन टेम्पलमध्ये रविवारी सांयकाळी घडली. चोरट्यांनी गोल्डन टेम्पलमधील दान पेटीतून तब्बल एक लाख रुपये लंपास केले. टेम्पलमधील कर्मचाऱ्यांनी पुरावा म्हणून पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दाखवले आहेत. या फुटेजमध्ये एक व्यक्ती देगणीच्या कच्चा पावत्या फाडत असल्याचं दिसत आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणारा व्यक्ती देगणी देण्याचा बनाव करताना दिसतोय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान प्रसिद्ध सबरीमला मंदिरातदेखील चोरीची घटना घडली होती. मंदिरातील देगणी पेटीतून पैसे लंपास करण्यात आले होते. याप्रकरणी एका ५० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली होती. या व्यक्तीचे नाव रेजीकुमार होते, तो त्रावणकोर देवस्वोम बोर्डाचा अधिकारी होता.

रेजीकुमार याने मंदिरातील दानपेटीतून ११ ग्रॅम वजनी सोन्याची बांगडी चोरली होती. एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे माता दुर्गा देवीच्या मंदिरात चोरीची घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. दुर्गा मातेच्या मंदिरातून ८०,००० हजार रुपये किमतीच्या सोन्याची चोरी झाली होती. या चोरीचा तपास हैदराबाद पोलिसांनी लावला होता.

Theft In Golden Temple
Amravati Crime: घरात घुसून सुवर्णकाराची हत्या; ७४ लाखाचा ऐवज लंपास

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com