Odisha Train Accident: मृत्यूनंतरही यातना; 4 दिवसांनंतर जीवलगांच्या मृतदेहांचा शोध; रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी

Indian Railway Helpline No: या भीषण अपघातामध्ये अनेकांच्या मृतदेहाची अवस्था अशी झाली आहे की ओळख पटवणं देखील कठीण झाले आहे.
Coromandel Express Train Accident Odisha
Coromandel Express Train Accident OdishaSaam TV
Published On

Odisha News: ओडिशातील बालासोर येथे 2 जून रोजी झालेल्या तिहेरी रेल्वे अपघाताने (Odisha Train Accident) संपूर्ण देश हादरला. या भीषण अपघातामध्ये 288 जणांनी आपला जीव गमावला तर 1100 पेक्षा अधिक जण जखमी झाले. या अपघातामध्ये अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्य जखमी भरून काढण्याचे काम सुरु आहे. या अपघातात अनेकांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं, तर अनेकांचा आधार या अपघतात हरपला आहे. अपघाताच्या चार दिवसांनंतरही अनेकजण आपल्या प्रियजनांचा शोध घेत आहे. ते जखमी आहे का त्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे हेच त्यांना कळत नाहीये. त्यामुळे ओडिशातील हॉस्पिटलबाहेर (Hospital) लोकांनी एकच गर्दी केली आहे.

Coromandel Express Train Accident Odisha
Madhya Pradesh Election: मध्यप्रदेशात काँग्रेसचं सरकार येणार; RSS ने सर्व्हे केल्याचा काँग्रेसचा दावा

या भीषण अपघातामध्ये अनेकांच्या मृतदेहाची अवस्था अशी झाली आहे की ओळख पटवणं देखील कठीण झाले आहे. बऱ्याच लोकांना आपल्या कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह देखील सापडले नाहीत. अशा बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. त्यांचे नातेवाईक हातात ओळखपत्र घेऊन शवागारात भटकत आहेत. अशा परिस्थितीत या कुटुंबांच्या मदतीसाठी रेल्वेनेही अनेक पावले उचलली आहेत. बेपत्ता लोकांच्या नातेवाइकांसाठी रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. तसेच ओडिशा सरकारच्या सहकार्याने तीन ऑनलाइन लिंकही तयार करण्यात आल्या आहेत.

Coromandel Express Train Accident Odisha
Pre Monsoon Rain: राज्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा, अनेक भागात झाडांची पडझड; बुलढाण्यात मोबाईल टॉवर कोसळला

ओडिशाच्या बालासोरमधील रेल्वे अपघातात बाधित झालेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी रेल्वेने ओडिशा सरकारच्या सहकार्याने तीन ऑनलाइन लिंक तयार केल्या आहेत. ा लिंकच्या माध्यमातून मृतांचे फोटो आणि विविध हॉस्पिटलध्ये उपचार घेत असलेल्या प्रवाशांची यादी जारी करण्यात आली आहे. या ऑनलाइन लिंक्सच्या माध्यमातून नातेवाईक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा शोध घेऊ शकतात. या लिंकद्वारे त्या मृतदेहांचीही माहिती देण्यात आली आहे ज्यांची ओळख अद्याप पटू शकली नाही.

Coromandel Express Train Accident Odisha
Delhi Firing Case: गोळीबाराने दिल्ली हादरली, दोन सख्ख्या भावांसह 4 जण गंभीर जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद

रेल्वेने एका निवेदनात सांगितले आहे की, 'भारतीय रेल्वेने ओडिशा येथे दोन रेल्वे आणि एका मालगाडीच्या भीषण अपघातात बाधित झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी ओडिशा सरकारच्या सहकार्याने पुढाकार घेतला आहे. या अपघातात बाधित झालेल्या प्रवाशांचे कुटुंबातील सदस्य/नातेवाईक/मित्र आणि हितचिंतक या लिंक्सद्वारे मृतांचे फोटो, विविध रुग्णालयात दाखल असलेल्या प्रवाशांची यादी आणि अनोळखी मृतदेहांची माहिती मिळवू शकतात.' या लिंक्सद्वारे आपल्या नातेवाईकांना शोधणं सोपं जाणार आहे.

रेल्वेने एक हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे. ज्याच्या माध्यमातून नातेवाईकांचा शोध घेणं सोपं जाणार आहे. हा हेल्पलाईन क्रमांक 24 तास काम करेल. हेल्पलाइन क्रमांक 139 रेल्वे अपघातात बाधित झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी/नातेवाईकांसाठी कार्यरत आहे. वरिष्ठ अधिकारी या हेल्पलाइन क्रमांकावर वैयक्तिकरित्या देखरेख करत आहेत. याशिवाय भुवनेश्वर महानगरपालिका हेल्पलाइन क्रमांक 18003450061/1929 हा देखील 24x7 कार्यरत आहे.

Coromandel Express Train Accident Odisha
Wrestlers Protest: ब्रिजभूषण यांच्या अडचणी वाढल्या! दिल्ली पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, लखनऊला जाऊन केली 12 जणांची चौकशी

रेल्वेद्वारा जारी करण्यात आलेल्या तीन लिंक -

मृतांच्या फोटोंची लिंक - https:rcodisha.nic.in/Photos Of Deceased with Disclaimer.pdf

वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या प्रवाशांच्या यादीची लिंक - https://www.bmc.gov.in/train-accident/download/Lists-of-Passengers-UnderGoing-Treatment-in-Different-Hospitals_040620230830.pdf

SCB कटक येथे उपचार घेत असलेल्या अज्ञात व्यक्तींची लिंक - https://www.bmc.gov.in/train-accident/download/Un-identified-person-under-treatment-at-SCB-Cuttack.pdf

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com