Delhi Firing Case
Delhi Firing CaseANI

Delhi Firing Case: गोळीबाराने दिल्ली हादरली, दोन सख्ख्या भावांसह 4 जण गंभीर जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद

Delhi Police: गोळीबारामुळे जाफराबाद परिसरात एकच खळबळ उडाली.
Published on

Delhi News: दिल्लीमध्ये गुन्हेगारीच्या (Delhi Crime) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. नुकताच झालेल्या साक्षी हत्याकांड प्रकरणाने (Delhi Sakshi Case) दिल्ली हादरली होती. अशामध्ये आता दिल्लीमध्ये गोळीबाराची (Delhi Firing) घटना समोर आली आहे. दिल्लीच्या जाफराबादमध्ये ही घटना घडली आहे. गोळीबारामध्ये दोन सख्ख्या भावांसह चार जण जखमी झाले आहेत. या घटनेचा तपास जाफराबाद पोलिसांकडून (Jaffarabad Police) सुरु आहे.

Delhi Firing Case
Wrestlers Protest: ब्रिजभूषण यांच्या अडचणी वाढल्या! दिल्ली पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, लखनऊला जाऊन केली 12 जणांची चौकशी

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर-पूर्वी दिल्लीच्या जाफराबाद परिसरात सोमवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. एका अज्ञात व्यक्तींनी चौघांवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये चौघेही गंभीर जखमी झाले. गोळीबारानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गोळीबारामुळे जाफराबाद परिसरात एकच खळबळ उडाली.

गोळीबारामध्ये जखमी झालेल्या तरुणांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच जाफराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. जखमी झालेल्या तरुणांची प्रकृती गंभीर आहे.

पीडित तरुणांची आई शायरा बानो यांनी सांगितले की, 'माझ्या दोन्ही मुलांना गोळ्या लागल्या आहेत. त्याचे कोणाशीही भांडण नव्हते.' या गोळीबारामध्ये हमजा आणि त्याचा सख्खा भाऊ आणि आणखी दोघे जखमी झालेत. हमजा आणि त्याचा भाऊ कपड्याचे दुकान चालवत होते. आपल्या दोन्ही मुलांना गोळी लागल्यामुळे शायरा बानो यांचे कुटुंबीय चिंतेत आले आहे.

हमजाच्या आईने पुढे सांगितले की, 'कामावरून घरी आल्यानंतर मुलं रात्री घराबाहेर बसले होते. मी घरात स्वयंपाक करत होतो. जेवण झाल्यावर दोघेही नमाज अदा करणार होते. याचदरम्यान अचानक काही जण आले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. इतक्यात शेजारचा एक मुलगा आमच्या घराकडे धावत आला. पण तोपर्यंत हल्लेखोर फरार झाले.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com