Delhi Police: भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात कुस्तीपटुंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याप्रकरणी गेल्या महिनाभरापासून कुस्तीपटूंचे दिल्लीत आंदोलन (Wrestlers Protest) सुरु आहे. नुकताच कुस्तीपटूंनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. आता याप्रकरणात दिल्ली पोलीस (Delhi Police) अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
या प्रकरणात आता ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्ली पोलिसांचे पथक सोमवारी रात्री ब्रिजभूषण यांच्या घरी दाखल झाले. लखनऊ आणि गोंडा येथील ब्रिजभूषण यांच्या घरी दाखल होत दिल्ली पोलिसांच्या एसआयटी पथकाने 12 जणांचे जबाब नोंदवले. यावेळी दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्यासोबतच त्यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या लोकांचे जबाब नोंदवत त्यांचे ओळखपत्र, नाव आणि पत्ते हे साक्षीदार म्हणून गोळा केले. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर पोलीस पुन्हा दिल्लीला रवाना झाले.
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैगिंक छळाचे आरोप करत कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतच्या जंतर-मंतर येथे आंदोलन सुरु करण्यात आले होते. ब्रिजभूषण यांच्याविरोधात सात महिला कुस्तीपटूंनी 21 एप्रिल रोजी लैंगिक छळ केल्याप्रकरणी कनॉट प्लेस पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारी दखल न घेतल्यामुळे कुस्तीपटूंनी आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनानंतर सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर 28 एप्रिलला संध्याकाळी ब्रिजभूषण यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले.
अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी ब्रिजभूषण सिंगवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. प्रौढ कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे दोन्ही गुन्हे दाखल होऊन देखील ब्रिजभूषण यांना अटक करण्यात आली नाही त्यामुळे कुस्तीपटूंनी आक्रमक होत संसद भवनावर मोर्चा काढला होता. त्यावेळी पोलिसांनी त्यांचे जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या ठिकाणचे तंबू आणि खुर्च्या हटवल्या होत्या. तरी देखील त्यांनी आंदोलन सुरु ठेवले. जोपर्यंत ब्रिजभूषण यांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा या आंदोलकांनी घेतला. तसंच, याप्रकरणी त्यांनी अमित शहांची भेट घेत कडक कारवाईची मागणी केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.