Delhi Metro Viral Video: मेट्रोमध्ये महिलांचा धिंगाणा; चप्पल आणि बॉटलचा वापर करून एकमेकींवर चढवला हल्ला -VIDEO

Delhi Metro Fight: २ महिला प्रवाशांमध्ये जोरदार जुंपल्याचं पाहायला मिळालं आहे. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे
Delhi metro viral video
Delhi metro viral videotwitter
Published On

Womens Fight In Metro: दिल्ली मेट्रोतून लाखो लोक प्रवास करत असतात. मात्र काही लोक आपल्या मर्यादा ओलांडताना दिसून येत असतात. काही दिवसांपूर्वीच दिल्ली मेट्रोतील काही अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते.

आता पुन्हा एकदा दिल्ली मेट्रो चर्चेचा विषय ठरतेय. यावेळी चर्चेत येण्याचं कारण म्हणजे, २ महिला प्रवाशांमध्ये जोरदार जुंपल्याचं पाहायला मिळालं आहे. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Delhi Metro Fight)

Delhi metro viral video
Kolkata Metro Train Viral Video: प्रेयसीला मिठीत घेतलं अन्...; धावत्या ट्रेन समोर उडी; थरकाप उडवणारी घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

हा व्हिडिओ दिल्ली मेट्रोतील महिलांच्या डब्यातील आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून, या व्हिडिओला कॅप्शन देत,' दिल्ली मेट्रो आता युद्ध भूमी बनली आहे..' असे लिहण्यात आले आहे.

मात्र ही घटना केव्हा घडली याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाहीये. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका महिलेच्या हातात चप्पल आहे तर दुसऱ्या महिलेच्या हातात स्टीलची बॉटल आहे. दोघेही एकमेकांना धमकी देताना दिसून येत आहेत.

तसेच अपशब्दाचा वापर करताना देखील दिसून येत आहेत. तिथे उपस्थित असलेल्या काही महिलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

यापुर्वी देखील व्हिडिओ झाले आहेत व्हायरल..

दिल्ली मेट्रोत अशा काही घटना घडण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. त्यामुळे दिल्ली मेट्रोतील प्रत्येक कोचमध्ये गार्ड तैनात करण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रो अश्लील चाळे करणाऱ्या कपलचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. त्यानंतर मेट्रोमध्ये डान्स करणारे व्हिडिओ जोरदार व्हायरल झाले होते. आता हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com