Nashik News: शिंदे-ठाकरे गटात पुन्हा वाद; पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी, एकमेकांना मारहाण केल्याचा दावा

Political News: खासदार संजय राऊत यांच्या थुंकण्याच्या घटनेचे पडसाद अद्यापही कायम
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSaam Tv
Published On

Nashik News Today: खासदार संजय राऊत यांच्या थुंकण्याच्या घटनेचे पडसाद अद्यापही कायम असून शनिवारी दुपारी मायको सर्कल येथे ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या घोषणाबाजी आणि बाचाबाचीची तक्रार थेट पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या तक्रारीनंतर ठाकरे गटानेही शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची तक्रार केली आहे. या परस्पर विरोधी तक्रारीतील तथ्य पोलीस तपासून पाहात आहे. या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.  (Latest Marathi News)

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Nashik Accident News: भरधाव टिप्परने कारला उडवलं, देवदर्शनाहून परतणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण जखमी

संजय राऊत (Sanjay Raut) नाशिक दौऱ्यावर असताना शिंदे गटाच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयाकडून वाहनाने जात होते. याच वेळी शिंदे गटाच्या युवा सेनेची बैठक सुरू होती. त्यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वाहने थांबवून 'संजय राऊत अंगार हैं, बाकी सब भंगार है' अशा घोषणा दिल्या.

यावेळी शिंदे गटानेही प्रत्युत्तर दिले, मात्र ठाकरे गटाची ही कृती शांतताभंग करणारी असल्याची तक्रार शिंदे गटाने दिली. कार्यालयासमोर युवा पदाधिकारी संविधानिक मार्गाने आंदोलन आणि निषेध व्यक्त करत असताना केवळ दंगा भडकावण्याच्या हेतूने खासदार संजय राऊत आणि त्यांच्या सोबतच्या जमावाने हा अनुचित प्रकार केला आहे. शहरातील शांतता कायम राखण्यासाठी संजय राऊत आणि त्यांच्या सोबतच्या जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. (Political News)

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Pune Gas Leak: बेकायदा गॅस विक्री जीवावर बेतली; गॅस गळती होऊन भाजलेल्या १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

तर खासदार संजय राऊत हे त्र्यंबक दौरा आटोपून मायको सर्कल मार्गे विश्रामगृहाकडे जात असताना शिंदे गटाकडून त्यांच्या विरोधात घोषणा देत ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला आणि एका शिवसैनिकाला मारहाण केली. शिंदे गटाने बेकायदेशीरपणे रस्ता अडवून मनाई आदेशाचे उल्लंघन केले असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी आणि गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ठाकरे गटाने केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com