Pune Gas Leak: बेकायदा गॅस विक्री जीवावर बेतली; गॅस गळती होऊन भाजलेल्या १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

Pune Marathi News: पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील घटना
Pune Marathi News
Pune Marathi NewsSaam Tv
Published On

अक्षय बडवे

Pune News Today: सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी परिसरातील एका किराणाच्या दुकानात बेकायदा स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची विक्री करणे जीवावर बेतले आहे. गॅस गळतीमुळे भाजलेल्या दुकानचालक आणि त्याच्या दोन मुलींपैकी एका १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना या मुलीचा मृत्यू झाला. तर दुकानदारासह त्याची लहान मुलगी गंभीर भाजलेले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Latest Marathi News)

Pune Marathi News
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट; दुसऱ्या टप्प्यात इतक्या मंत्र्यांचा शपथविधी होणार!

गीता चौधरी असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मन्नाराम यांचे किरकटवाडी येथे किराणा मालाचे दुकान असून त्या ठिकाणी ते घरगुती गॅस सिलिंडरची विक्री करत होते. मोठ्या गॅस सिलिंडरमधून लहान सिलिंडर (Cylinder) मध्ये गॅस भरण्यासाठी त्यांनी एक गोडाऊन भाड्याने घेतले होते. त्या ठिकाणी ते बेकायदेशीरपणे हे गॅस भरत असत आणि विकत होते. (Pune News)

Pune Marathi News
Train Accident Update: ओडिशा ट्रेन अपघाताच्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक खुलासा, सीबीआयकडे पुढील तपासाची जबाबदारी

मन्नाराम चौधरी आणि त्यांच्या दोन मुली असे तिघेजण गोडाऊनमध्ये मोठ्या सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस भरत असताना गॅस गळती झाली आणि आगीचा भडका उडाला. यात मन्नाराम आणि त्यांच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या.

काल यातील गीताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मन्नाराम चौधरी आणि त्यांच्या लहान मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या घटनेमुळे धोकादायकपणे बेकायदा घरगुती गॅस सिलिंडर विक्रीचा प्रश्न समोर आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com