Madhya Pradesh Election: मध्यप्रदेशात काँग्रेसचं सरकार येणार; RSS ने सर्व्हे केल्याचा काँग्रेसचा दावा

Madhya Pradesh Election RSS Survey: मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचंच सरकार येणार असा मोठा दावा, काँग्रेसकडून करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या सर्व्हेवरून हा दावा करण्यात आला आहे.
Madhya Pradesh Election RSS Survey
Madhya Pradesh Election RSS SurveySaam TV

Madhya Pradesh Election 2023: मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचंच सरकार येणार असा मोठा दावा, काँग्रेसकडून करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या सर्व्हेवरून हा दावा करण्यात आला आहे. इतकंच नाही, तर भाजपाला केवळ ५५ जागांवर समाधान मानावं लागणार आहे, असं या सर्व्हेमध्ये म्हटलं असल्याचा दावा देखील काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत हा दावा केला आहे. (Latest Marathi News)

Madhya Pradesh Election RSS Survey
Nashik News: शिंदे-ठाकरे गटात पुन्हा वाद; पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी, एकमेकांना मारहाण केल्याचा दावा

काँग्रेसला (Congress) कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. या निकालानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह पाहायला मिळत आहे. कर्नाटकनंतर आता मध्यप्रदेशात वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

दरम्यान, काँग्रेसने ट्विट करत म्हटलं, “मध्य प्रदेशमध्ये यावर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीआधी अनेक सर्व्हे समोर आले आहेत. यात मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येत असल्याचं दिसत आहे".

भाजपाला (BJP) केवळ ५५ जागांवर समाधान मानावं लागणार आहे. काँग्रेसकडे २०१८ च्या १५ महिन्यांचा कार्यकाळाचा अनुभव आणि कमलनाथ यांच्यासारखा निर्विवाद व अनुभवी नेता आहे. हे मुद्दे घेऊन काँग्रेस जनतेसमोर जात आहे.”

“भाजपाची १८ वर्षांची देणेदारी आणि अपूर्ण घोषणांमुळे जनतेत सरकारविरोधी मोठी लाट तयार झाली आहे. मागील पाच महिन्यात मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत सहा वेगवेगळे सर्व्हे झाले आहेत. सर्व सर्व्हेंमध्ये भाजपाच्या जागा सातत्याने कमी होताना दिसत आहे. इतकंच नाही, तर सर्व सर्व्हेंमध्ये भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचं समोर येत आहे,” असा दावा काँग्रेसने केला आहे.

दरम्यान आरएसएसने केलेल्या या दाव्यावरून भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. सर्व्हे समोर आल्यानंतर विद्यमान ६० टक्के आमदारांचं तिकीट कापावं अशी सूचनाही भाजपने दिल्या असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com